नायब तहसीलदारास उदगीरमध्ये मारहाण
By Admin | Updated: November 28, 2014 01:12 IST2014-11-28T00:10:34+5:302014-11-28T01:12:00+5:30
उदगीर : उदगीरचे नायब तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांना कार्यालयात घुसून व जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली.

नायब तहसीलदारास उदगीरमध्ये मारहाण
उदगीर : उदगीरचे नायब तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांना कार्यालयात घुसून व जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. गुरुवारी घडलेल्या या घटनेबाबत अॅट्रासिटीचा गुन्हा शहर पोलिसांत एकाविरुद्ध नोंदविण्यात आला़
उदगीर येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांच्याकडे पुरवठा विभागाचा पदभार असताना त्यांनी हॉटेल्समधील घरगुती वापराचे गॅस सिलेंडर जप्त केले होते़ जप्त केलेले सिलेंडर परत घेण्यासाठी या धाब्याचे चालक तुळशीदास पडिले व त्यांच्या सोबत एक महिला तहसील कार्यालयात गुरुवारी आले़ कार्यालयीन कामकाजात व्यस्त असलेले नायब तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांना पडिले यांनी जप्त केलेले सिलेंडर परत देतोस की नाही म्हणून टेबलवर असलेली शासकीय कागदपत्रे फाडून मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली, असे देवणीकर यांनी उदगीर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पडिले यांच्याविरुध्द गुन्हा नोंद आहे. (प्रतिनिधी)४
नायब तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांना झालेल्या मारहाणीचा महसूल कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे़ आरोपीच्या अटकेची मागणी केली.