नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी
By Admin | Updated: October 1, 2016 01:18 IST2016-10-01T01:07:05+5:302016-10-01T01:18:37+5:30
लातूर : शहरासह जिल्हाभरात विविध नवरात्र उत्सव मंडळांकडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे

नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी
लातूर : शहरासह जिल्हाभरात विविध नवरात्र उत्सव मंडळांकडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. उत्सव काळात मंडळांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यंदा गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही पोलिस प्रशासनाकडून डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी, लातूर शहारातील गंजगोलाई परिसरातील बाजारपेठ पूजेच्या साहित्यांनी गजबजली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून महिलावर्गातून नवरात्रोत्सवाची विशेष तयारी सुरु आहे. घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी गंजगोलाई परिसरात शुक्रवारी दिवसभर महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. या उत्सवाची घरा-घरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव गुरुवार आणि शुक्रवारी करण्यात आली. शहरासह जिल्हाभरात नवरात्र उत्सव मंडळांकडूनही मोठ्या प्रमाणावर उत्सवाची तयारी करण्यात आली आहे. जिल्हाभरात विविध गावांमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त घटनस्थापना करुन देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त लावला आहे. नवरात्रोत्सवासाठी पोलिस प्रशासनाने गावागावांत बैठका घेवून विशेष सूचना दिल्या आहेत.