नशेत आईला मारहाण
By Admin | Updated: June 24, 2017 23:44 IST2017-06-24T23:41:22+5:302017-06-24T23:44:51+5:30
पिंपळगांव रेणूकाई : दारूच्या नशेत आईला मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या मुलास पारध पोलिसांनी चार दिवस उलटूनही ताब्यात घेतलेले नाही

नशेत आईला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगांव रेणूकाई : दारूच्या नशेत आईला मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या मुलास पारध पोलिसांनी चार दिवस उलटूनही ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील संजय अंभोरे याने बुधवारी दारूच्या नशेत आई कांताबाई यांना बेदम मारहाण केली. नातेवाइकांनी त्यांना औरंगाबाद शासकीय रुग्णालयात दाखल केले. आईला उपचारासाठी पाठविल्याचे कळताच संजयने आईचे रक्ताचे कपडे जाळून टाकले. सरपंच मधुकर ठाकरे यांनी पारध पोलिसांना याची माहिती दिली. मात्र, बीट जमादारांनी दखल घेतली नाही. त्यामुळे सरपंच ठाकरे यांनी ग्रामस्थांसोबत येऊन पारध ठाण्यात येऊन संजय अंभोरेविरुद्ध तक्रार केली. घटनेला चार दिवस उलटूनही पोलिसांनी मुलास ताब्यात घेतलेले नाही. सहायक पोलीस निरीक्षक मोहन भागवत म्हणाले, ग्रामस्थांनी संतोष अंभोरे विरुद्ध दिलेल्या तक्रारीच्या त्यानुषंगाने चौकशी केली आहे. गु्न्हा नोंद नसल्यामुळे त्यास अटक केलेली नाही.