रविवारपासून नाट्यमहोत्सवाची मेजवानी
By Admin | Updated: April 14, 2017 01:06 IST2017-04-14T01:04:07+5:302017-04-14T01:06:46+5:30
उस्मानाबाद : शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलासह इतर दोन रंगमंचांवर २१ ते २३ एप्रिल या कालावधीत ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारपासून नाट्यमहोत्सवाची मेजवानी
उस्मानाबाद : शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलासह इतर दोन रंगमंचांवर २१ ते २३ एप्रिल या कालावधीत ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर १६ ते २० एप्रिल या कालावधीत नाट्य महोत्सव रंगणार आहे़ या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मधुकरराव चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील, आ. बसवराज पाटील, आ. राहुल मोटे, आ. ज्ञानराज चौगुले, आ. दिलीपराव देशमुख, आ. सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार प्रा. तानाजी सावंत, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत नाडापुडे आदींची उपस्थिती राहणार आहे. नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनानंतर लगेचच आॅल दी बेस्ट-२ या नाट्यकृतीचे सादरीकरण होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे.