उजाड माळरानावर साकारले निसर्ग पर्यटन केंद्र

By Admin | Updated: September 7, 2014 00:24 IST2014-09-07T00:05:15+5:302014-09-07T00:24:25+5:30

राम तत्तापूरे , अहमदपूर अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत वन विभाग उस्मानाबाद परिक्षेत्र अहमदपूरच्या

Nature tourism center, built on the famous Udjara Mallarana | उजाड माळरानावर साकारले निसर्ग पर्यटन केंद्र

उजाड माळरानावर साकारले निसर्ग पर्यटन केंद्र


राम तत्तापूरे , अहमदपूर
अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत वन विभाग उस्मानाबाद परिक्षेत्र अहमदपूरच्या ४० एकर वनक्षेत्रावर लातूर जिल्ह्यातील सर्वसोयीयुक्त असे निसर्ग पर्यटनकेंद्र उभारण्यात आले असून, ते पाहण्यासाठी गर्दी होत आहे़
तालुक्यातील उजाड मन्याड खोऱ्याच्या माळरानावर तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी आऱजी़मुद्दमवार, विभागीय वनअधिकारी बी़एनक़दम, वनरक्षक एऩएस़बिराजदार यांच्या संकल्पनेतून ४० एकरच्या उजाड माळरानावर निसर्ग पर्यटन केंद्र करण्याचा संकल्प दोन वर्षापूर्वी करण्यात आला़ त्या दृष्टीेने अहोरात्र परिश्रम करून शासनाच्या मदतीने लिंबोटी धरणात १५ एच़पी़ची मोटार टाकून पाण्याची सोय केली़ दोन किलोमीटर अंतरावरून ४ इंचाची पाईपलाईन केली़ १ लाख लिटर्स पाणी साठवणाची सोय केली़ त्या माध्यमातून १० हजार वृक्षांना ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करून त्या वृक्षाची जोपासना करण्याचे काम सुरु करण्यात आले़
वन परिक्षेत्राच्या मधोमध पाहणी मनोरा करण्यात आला असून, ४० एकरवर उभारण्यात आलेल्या पर्यटन क्षेत्रावर देखणे रस्ते, पूल आणि रस्त्याच्या दूतर्फा नारळ, गोगनबेल, रिकोमा, कन्हेरी, जास्वंद, गुलाब, स्वास्तिक, सदाफुली, झेंडू, शेवंती, पिवळी कन्हेरी तर बाकीच्या वनक्षेत्रावर वनौषधी आणि दुर्मिळ लोप पावत असलेल्या रोपांची लागवड करण्यात आली़ यामध्ये विशेष करून बिबा, पिंपळ, आंबा, आवळा, लिंब, मोघणी, जांभूळ, पॅथोडिया, सिसम, सिरस, सिसू, मोहगणी, लक्ष्मीतरू, कांचन, कॉरिआ, वॉटर ब्रश, सप्तपर्णी, चिंच, मोरपंखी, मद्राक्ष, सिल्व्हर ओके, बांबू, आकाश मोगरा, फणस, साग, चंदन, हत्तीफळ, बेल, ईडी, करवंद आदीं वृक्षांनीपर्यटन केंद्र फुलून गेले आहे़ हे वन मन्याड नदीच्या तिरावर उभारण्यात आल्याने या वनामध्ये ससे, हरिण, राणडुक्कर, सायाळ, सापांच्या विविध जाती, पक्षी, घुबड, कोकीळा, चिमणी, निळकंठ, घार, कबूतर इतर दुर्मिळ पक्षी दिसून येतात़ या पर्यटनाच्या माध्यमातून पशुंच्या पाण्याच्या सोयीसाठी सुंदर अशी पाणपोई उभारण्यात आली आहे़
तसेच लहान मुलांसाठी घसरगुंडी, झुले, सिसॉ, डबल डेकर, डबलबार आदी सुविधा निर्माण केल्या आहेत़ तसेच वृद्ध व ज्येष्ठांसाठी दर्जेदार लॉन्स, फिरण्यासाठी पॅच तयार करण्यात आला आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र मिनरल वॉटर प्लँटही बसविण्यात आला आहे़ या नव्या पर्यटन स्थळास भेट देण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे़
\या पर्यटन केंद्राची सुरुवात २०१२ मध्ये करण्यात आली़ २०१४ मध्ये निसर्ग पर्यटनस्थळाचे काम पूर्ण झाले़ या पर्यटन क्षेत्रात भर पडावी या दृष्टीकोनातून आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, तहसीलदार विजय अवधाने, पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़

Web Title: Nature tourism center, built on the famous Udjara Mallarana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.