शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग तर कोपलाच, दुष्काळ निवारण पथकाचीही बीडला हुलकावणी

By admin | Updated: July 30, 2015 00:13 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले; परंतु, वरुणराजा रुसलेलाच आहे. निसर्गाने अशी थट्टा मांडलेली असताना मायबाप सरकारला दुष्काळ पहायलाही वेळ नाही.

व्यंकटेश वैष्णव , बीड पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले; परंतु, वरुणराजा रुसलेलाच आहे. निसर्गाने अशी थट्टा मांडलेली असताना मायबाप सरकारला दुष्काळ पहायलाही वेळ नाही. दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी बीडला येणाऱ्या दिल्लीच्या पथकाचा दौरा रद्द झाल्याने सरकारी यंत्रणा कशी सुस्तावली आहे, याची प्रचिती जिल्हावासियांना आली आहे. जिल्हा मागील तीन वर्षांपासून दुष्काळी चटके सोसत आहे. खालावत चाललेल्या पाणीपातळीने तर टंचाईचे सावट आणखीच बिकट केले आहे. उद्धवस्थ झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. जिल्ह्यात सहा महिन्यात दीडशेवर शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. यावरुन जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीचे उग्ररुप अधोरेखित होते. चालू वर्षी बरोबर ७ जूनच्या मुहूर्तावर कोसळलेल्या सरींनी शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते. कर्ज काढून, सोने गहाण ठेवून शेतकऱ्यांनी बी- बियाणाची तरतूद केली. पेरलेले बियाणे कुठे उगले तर कुठे उगवले नाही. त्यानंतर गायब झालेला पाऊस पुन्हा बरसलाच नाही. त्यामुळे पाच लाख हेक्टरवरील खरीप पिके हातची गेली. दोन महिने उलटले तरीही पाऊस न झाल्याने आता दुबार पेरणीची संधीही गेली आहे. कोट्यवधींचे बियाणे ‘माती’त गाडलेल्या शेतकऱ्यांना पिकापेक्षा जित्राबाचीच जास्त चिंता आहे. जिल्ह्यावर ओढावलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्रसिंग व केंद्रीय फलोत्पादन आयुक्त अतुुल पाटणे हे ३१ जुलै व १ आॅगस्ट रोजी बीडमुक्कामी येणार होते. पीक- पाण्याची परिस्थिती थेट बांधावर जाऊन ते पाहणी करणार होते. त्याचा अहवाल केंद्र सरकारला जाणार होता. आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयास यासंदर्भातील पत्र आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन तयारीला लागले होते. दुष्काळ निवारण पथकाला कुठल्या भागातील पिके दाखवायची? पाणीपातळी तपासण्यासाठी कोठे न्यायचे? इथपासून ते मुक्कामाची व्यवस्था कोठे करायची? इथपर्यंतचे नियोजन सुरुहोते. मात्र, बुधवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना पथकाचा दौरा रद्द झाल्याचे पत्र आले आहे. त्यामुळे पावसापाठोपाठ सरकारी यंत्रणाही बीडपर्यंत पोहोचण्यात विलंब करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.