राष्ट्रवादी रस्त्यावर !

By Admin | Updated: January 9, 2017 23:42 IST2017-01-09T23:41:44+5:302017-01-09T23:42:33+5:30

उस्मानाबाद : केंद्र शासनाने केलेल्या नोटबंदीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर, व्यापारी आणि लहान-मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

Nationalist street! | राष्ट्रवादी रस्त्यावर !

राष्ट्रवादी रस्त्यावर !

उस्मानाबाद : केंद्र शासनाने केलेल्या नोटबंदीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर, व्यापारी आणि लहान-मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अक्षरश: खिळखिळी झाली आहे. चलन तुटवडा असल्याने बाजारपेठेतही शुकशुकाट आहे. शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. असे असतानाही शासनाकडून कुठल्याही स्वरूपाच्या ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाभरात आंदोलने करण्यात आली. नळदुर्गसह उमरग्यात रास्तारोको, तर कळंब, भूम, परंडा, लोहारा आणि वाशी येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरच्या रात्री अचानक नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयान्वये पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. तेव्हापासून ते आजतागायत जिल्हाभरात चलनकल्लोळ सुरूच आहे. या नोटबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांसह शेतमजुरांना बसला आहे. शेतीमालाचे दर प्रचंड घसरले आहेत. असे असतानाही शासनाकडून ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार चलन उपलब्ध करून दिले जात नाही. शासनाच्या या धोरणाविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आंदोलने करून उपरोक्त प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.
तहसील कार्यालयावर मोर्चा
परंडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, नवनाथ जगताप, शहराध्यक्ष वाजीद दखणी, युवक तालुकाध्यक्ष धनंजय हांडे, अ‍ॅड. सुभाष वेताळ, बापू मिस्किन, भाऊसाहेब खरसडे, अ‍ॅड. जफर जिनेरी, अ‍ॅड. सुहास पाटील, राहुल बनसोडे, जावेद पठाण, राजकुमार देशमुख, रवी मोरे, अमोल जगताप, सचिन पाटील, सुधाकर कोकाटे, घनशाम शिंदे, पोपट चव्हाण, महावीर भोई, नंदू शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, विक्रम ढोरे, नाना मांडवेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चानंतर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन सरकारविरोधी घोषणाबाजी केली. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देण्यात आले.
लोहाऱ्यात धरणे आंदोलन
लोहारा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अच्युत साठे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, युवक तालुकाध्यक्ष अजित जाधव, उपनगराध्यक्षा नाजमीन शेख, बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, बाजार समितीचे संचालक अनंत गोरे, गटनेते गगन माळवदकर, नगरसेवक आयुब शेख, नगरसेविका जयश्रीताई वाघमारे, शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, नरदेव कदम, विजयकुमार लोमटे, कानेगावचे माजी सरपंच उज्वल कदम, प्रकाश भगत, दिलीप शिंदे, गोविंद साळुंके, बळीराम लव्हळे, निहाल मुजावर, सुरेश दंडगुले, जाकीर कुरेशी आदी उपस्थित होते.
कळंबमध्ये ‘जनआक्रोश’
केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कळंबमध्ये ‘जनआक्रोश’ आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आाले. यावेळी कळंब पालिकेच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, तालुकाध्यक्ष रामहारी शिंदे, भास्कर खोसे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती धनंजय वाघमारे, श्रीधर भवर, विकास बारकूल, प्रा. तुषार वाघमारे, शहराध्यक्ष सागर मुंडे, संदीप मडके, प्रा.संजय कांबळे, इंद्रजीत गायकवाड, अमर गायकवाड, औदुंबर धोंगडे, बालाजी भातलवंडे, संदीप मडके, प्रणव चव्हाण, तारीक मिर्झा आदी उपस्थित होते.
भूममध्येही धरणे आंदोलन
नोटबंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप करीत भूममध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार राहुल मोटे, तालुकाध्यक्ष हनुमंत पाटुळे, प्रतीकसिंह पाटील, ज्ञानेश्वर गीते, अरूण सोन्ने, सतीश सोन्ने, सभापती शिवाजी जालन, प्रवीण खटाळ, सभापती संजय पाटील, राहुल पाटील, संजय बोराडे, श्रीहरी बारस्कर, उध्दवराजे सस्ते, सुग्रीव दराडे, आदिनाथ पालके, राजकुमार घरत, राजाभाऊ हुंबे, दिग्विजय लोंढे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, माजी नगराध्यक्ष संपत डोके, रामचंद्र पाटील, सभापती सुनिल खळदकर, सतीश दंडनाईक, भारत डोलारे, नगरसेवक अभय इंगळे, प्रदीप मुंडे, खलिफा कुरेशी, अभिजित काकडे, रोहित निंबाळकर, अमित शिंदे, दत्ता पेठे, ओम मगर, राजसिंह राजेनिंबाळकर, कैैलास पाटील, डॉ. इंद्रजित जाधव, अमित पडवळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासन धोरणविरोधी घोषणाबाजी केली.(प्रतिनिधी)

Web Title: Nationalist street!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.