सभापतीपदी राष्ट्रवादीचे धनंजय वाघमारे बिनविरोध

By Admin | Updated: November 30, 2015 23:30 IST2015-11-30T23:21:20+5:302015-11-30T23:30:29+5:30

कळंब : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय वाघमारे तर उपसभापतीपदी अरूण चौधरी यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली.

Nationalist Congress Party's Dhananjay Waghmare elected unanimously | सभापतीपदी राष्ट्रवादीचे धनंजय वाघमारे बिनविरोध

सभापतीपदी राष्ट्रवादीचे धनंजय वाघमारे बिनविरोध


कळंब : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय वाघमारे तर उपसभापतीपदी अरूण चौधरी यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. राकाँच्या ताब्यात गेलेल्या या संस्थेचे सभापती होण्यासाठी इच्छूकांची संख्या अधिक होती. परंतु, पक्ष नेतृत्वाने वाघमारे व चौधरी यांच्या रुपाने बाजार समितीत नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे,
आॅक्टोबरमध्ये झालेल्या पंचावार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळ अजमावून १८ पैकी १५ जागांवर वर्चस्व मिळविले होते. तर प्रतिस्पर्धी सेना-काँग्रेस आघाडीतील सेनेला केवळ एक आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समितीत एकहाती वर्चस्व मिळविले असले तरी सभापती, उपसभापती पदासाठी इच्छूक असलेल्या संचालकांची संख्या मात्र जास्त होती. यातच प्रत्येक इच्छूक आपापल्या परिने मोर्चेबांधणी करीत होते. संचालक नसलेले काही कार्यकर्तेही या ‘लॉबींग’साठी धावपळ करताना दिसून आले. सोमवारी पिठासन अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सी. पी. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी सभापतीपदासाठी धनंजय वाघमारे (बाभळगाव) तर उपसभापती पदासाठी रायुकाँचे तालुकाध्यक्ष अरूण चौधरी यांची निवड बिनविरोध जाहीर झाली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाजार समितीचे सचिव सूर्यकांत चव्हाण यांनी काम पाहिले.

Web Title: Nationalist Congress Party's Dhananjay Waghmare elected unanimously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.