राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रवाद संकुचितच
By Admin | Updated: April 15, 2016 00:41 IST2016-04-15T00:10:16+5:302016-04-15T00:41:58+5:30
लातूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रभक्तीचा विचार सांगतो़ मात्र त्यांची राष्ट्रभक्ती संकुचित आहे़ खरच त्यांची राष्ट्रभक्ती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रवाद संकुचितच
लातूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रभक्तीचा विचार सांगतो़ मात्र त्यांची राष्ट्रभक्ती संकुचित आहे़ खरच त्यांची राष्ट्रभक्ती व्यापक आणि समतेची असती तर त्यांनी सरसंघचालक म्हणून मुस्लिम किंवा दलित जातीतील व्यक्तीला स्थान दिले असते़ वास्तविक पाहता त्यांची राष्ट्रभक्ती संकुचित आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले़
बीएसएनएल च्या वतीने डॉ़बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती टेलिफोनभवन येथे गुरुवारी साजरी करण्यात आली़ अध्यक्षस्थानी बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक अनंतराम चौधरी होते़ मुंबई बीएसएनएलचे सहाय्यक महाप्रबंधक अनिल बनसोडे, उस्मानाबादचे उपमहाप्रबंधक एमक़े़सुर्यवंशी, सहाय्यक महाप्रबंधक यु़जी़निटूरे, एसक़े़येवरे, एसक़े़लद्दे, ए़ एम़ कुलकर्णी, जे़ बी़ कुरील, पी़ डी़ कापसे, व्ही़बी़मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ सबनीस म्हणाले, महापुरुष हे कधीच संकुचित नसतात, जातीवादी नसतात़ जातीवादी असलेले महापुरुष होत नसतात, ब्राह्मण्य व्यवस्थेला सर्व समाज बळी पडला आहे़ ब्राम्हण वेगळे व ब्राह्मण्य वेगळे़ सध्याच्या परिस्थितीत ब्राम्हण्य जोपासणारे सर्व जातीधर्मात निर्माण झाले असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवादावर टीका केली़ खरा इस्लाम हिंदू विरोधक नाही तर खरा हिंदू इस्लाम विरोधक कधीच होत नाही़ देशातील ब्राह्मणांनी समाजाची दिशाभूल करून स्वत:च्या अस्तित्वासाठी दरी निर्माण केली़
अन् बाबासाहेबमय झालो
बाबासाहेब आंबेडकर मला माहीत नव्हते कारण जातीची भिंत आडवी होती़ त्यामुळे माझ्या घरी पहिले पुस्तक होते ते गांधीजींचे़ ते वाचल्यानंतरच कुठे बाबासाहेब आंबेडकर कळाले़ आज एवढे कळाले की पुर्णपणे मी बाबासाहेबमय झालो असल्याचे डॉ़ सबनीस म्हणाले़