शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत शनिवारी राष्ट्रीय कार्यशाळा

By admin | Updated: July 7, 2015 00:55 IST

औरंगाबाद : संपूर्ण देशभरात शालेय पोषण आहार योजनेत एकवाक्यता असावी, या हेतूने केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने ११ जुलै रोजी या योजनेसंबंधी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

औरंगाबाद : संपूर्ण देशभरात शालेय पोषण आहार योजनेत एकवाक्यता असावी, या हेतूने केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने ११ जुलै रोजी या योजनेसंबंधी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाचे दोन सचिव, ८ राज्यांचे सचिवस्तरीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील ३४ शिक्षणाधिकारी सहभागी होणार आहेत. जालना रोडवरील हॉटेल ‘लेमन ट्री’मध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी केंद्र तसेच विविध राज्यांचे सचिवस्तरीय अधिकारी हे ९ जुलैपासूनच औरंगाबादेत दाखल होतील. शिवाय या कार्यशाळेत महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, शिक्षण संचालक तसेच शिक्षण उपसंचालक सुधाकर बानाटे हेदेखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय समितीमध्ये सहभागी असलेले ८ राज्य व मानव संसाधन मंत्रालयाचे सचिव यांच्या या कार्यशाळेत पोषण आहारासंबंधी अंमलात आणल्या जाणाऱ्या नवीन धोरणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या सदस्यांना औरंगाबाद हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे याठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे अधिकारी सांगत असले तरी, कार्यशाळेच्या निमित्ताने समिती सदस्यांना औरंगाबादलगत अजिंठा, वेरूळ या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देणे सहज सोपे होईल. या उद्देशाने ही कार्यशाळा औरंगाबादेत ठेवली असावी, असा अंदाज काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, कार्यशाळेच्या तीन दिवस अगोदरच जिल्हा परिषद शाळांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, खाजगी अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना शालेय पोषण आहारासंबंधीचे अभिलेखे अद्ययावत करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी दिल्या आहेत.४ शिवाय मानधन वाटप, स्वयंपाकी, मदतनिसांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, शालेय परिसर, किचन शेड, स्वच्छतागृह, वर्गखोल्यांची स्वच्छता, पोषण आहाराचा साठा स्वच्छ ठिकाणी ठेवला जावा, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हँडवॉश, पोषण आहाराचे वाटप स्वच्छ ताटामध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.