सीए संघटनेची आजपासून राष्ट्रीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:53 IST2017-08-05T00:53:52+5:302017-08-05T00:53:52+5:30
आयसीएआयची स्थानिक शाखा व डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने ५ व ६ आॅगस्ट रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

सीए संघटनेची आजपासून राष्ट्रीय परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आयसीएआयची स्थानिक शाखा व डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने ५ व ६ आॅगस्ट रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा परिसरातील आयसीएआय भवन येथे ५ रोजी सकाळी १० वाजता परिषदेचे उद्घाटन आयकर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डायरेक्ट टॅक्स कमिटीचे उपअध्यक्ष सीए एन.सी.हेगडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिषदेत लहान, मध्यम व्यवहाराशी संबंधित प्रकरणे, कायदे, आयटी अधिनियम, विविध तरतुदीनुसार रोख व्यवहाराचे परिणाम यावर पहिल्या दिवशी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. दुसºया दिवशी मुल्यमापन, बेनामी ट्राँक्झॅक्शन, रियल इस्टेटची कर आकारणी आदी विषयावर मार्गदर्शंन करण्यात येणार आहे. तज्ज्ञ अॅड. कपिल गोयल,सीए चंद्रशेखर चितळे, सीए एम.आर. हुंडीवाला, सीए चैतन्य के.के., सीए जगदीश पंजाबी यांचे मार्गदर्शन लाभेल, अशी माहिती सीए संघटनेचे अध्यक्ष अल्केश रावका यांनी दिली.