नाथांचा पवित्र रांजण तिस-या दिवशी भरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:34 IST2018-03-07T00:34:08+5:302018-03-07T00:34:12+5:30
नाथ महाराजांच्या राहत्या वाड्यातील ( गावातील नाथ मंदिर) पवित्र रांजण मंगळवारी (तिसºया दिवशी) माजलगाव येथील महिला भाविक शीलाबाई भानप यांनी रांजणात पाणी ओतल्यानंतर काठोकाठ भरला.

नाथांचा पवित्र रांजण तिस-या दिवशी भरला
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : नाथ महाराजांच्या राहत्या वाड्यातील ( गावातील नाथ मंदिर) पवित्र रांजण मंगळवारी (तिसºया दिवशी) माजलगाव येथील महिला भाविक शीलाबाई भानप यांनी रांजणात पाणी ओतल्यानंतर काठोकाठ भरला.
भगवान श्रीकृष्णानेदेखील याच रांजणात गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरल्याची आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून नाथषष्ठीदरम्यान ज्या भाविकाच्या हस्ते रांजण भरतो, त्या भाविकास भगवान श्रीकृष्ण मानून त्याचा सत्कार नाथवंशजांच्या हस्ते करण्यात येतो. यंदा रांजण भरण्याचा मान माजलगाव येथील शीलाबाई भानप यांना मिळाल्याने रीतिरिवाजाप्रमाणे नाथवंशजांनी त्यांचा सत्कार केला. रांजण भरल्यानंतर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठीला हजेरी लावतात, असे मानले जाते.