नाथ सुपरमार्केट ठेवणार गहाण
By Admin | Updated: November 27, 2014 01:10 IST2014-11-27T01:08:43+5:302014-11-27T01:10:59+5:30
औरंगाबाद : महापालिकेने समांतर जलवाहिनीसाठी १००, महावितरणची थकबाकी देण्यासाठी १००, असे २०० कोटी रुपयांचे कर्ज २०११-१२ मध्ये काढले आहे

नाथ सुपरमार्केट ठेवणार गहाण
औरंगाबाद : महापालिकेने समांतर जलवाहिनीसाठी १००, महावितरणची थकबाकी देण्यासाठी १००, असे २०० कोटी रुपयांचे कर्ज २०११-१२ मध्ये काढले आहे. या कर्जासाठी अब्जावधी किमतीची मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवण्याचा करार मनपाने केला आहे. त्यासाठी औरंगपुऱ्यातील नाथ सुपरमार्केट, गारखेडा रिलायन्स मॉलमधील मनपा मालकीची जागा, झांशी की राणी उद्यान परिसर आणि पदमपुऱ्यातील फायर ब्रिगेड कॉम्प्लेक्ससह १३ मोक्याच्या ठिकाणांवरील मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवण्यात येणार आहेत. बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत काही अब्जावधी रुपयांत जाते. यापूर्वी मनपाने १७ मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत.
मात्र, मनपाने गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन बँकेने १७० कोटी रुपये काढले आहे. त्यामुळे पालिकेला दरमहाच्या व्याज व मुद्दल फेडीच्या रकमेत १ टक्का अतिरिक्त जास्तीचे व्याज भरावे लागत आहे. १६ लाख रुपये दरमहा जास्तीचे जात आहेत.
२०० कोटींच्या परतफेडीसाठी मनपा ३ कोटी ६६ लाख रुपये अदा करीत आहे. मनपाकडे समांतर योजनेसाठी ९३ कोटी रुपये ‘एएसओजी’ खात्यावर ठेवण्यासाठी नव्हते. त्यामुळे बँकेकडून कर्जरूपाने ती रक्कम उभी करण्यात आली, तसेच महावितरणची ३५० कोटी रुपयांची थकबाकी मनपाकडे होती. वन टाईम सेटलमेंटने थकबाकीतील १०० कोटी भरण्यात आले. कर्ज काढून १०० कोटी रुपये मनपा सत्ताधाऱ्यांनी अदा केले. १३ मालमत्ता गहाण ठेवण्याबाबत कुणाला आक्षेप असेल, तर ७ दिवसांत बँकेकडे अथवा मनपाकडे नोंदविता येतील.
वेदांतनगर, रेल्वेस्टेशन १८३४९/१/९९ ४०५७ चौ.मी.
रेल्वेस्टेशन, व्यापारी संकुल१९२५९/११४४४ चौ.मी.
रेल्वेस्टेशन, व्यापारी संकुल१९२५९४५१.४३ चौ.मी.
पदमपुरा, फायर ब्रिगेड कॉम्प्लेक्स१९६४५६१६.९० चौ.मी.
गारखेडा१५७३५/१६२९५ चौ.मी.
विश्वभारती कॉलनी सर्व्हे नं.६१/५१५७३५/१०३८७६ चौ.मी.
शहानूरवाडी१६३२१/१४०४२.१६ चौ.मी.
शहानूरवाडी१६३२१/३१५६३.१७ चौ.मी
शहानूरवाडी१६३२१/२३९०५.१७ चौ.मी
पदमपुरा१९६६०१५६८ चौ.मी.
कांचनवाडीगट क्र.४७/३४४६१.०४ चौ.मी
नाथ सुपर मार्केटसर्व्हे नं.८०क्षेत्रफळ दिले नाही
क्रांतीचौकसर्व्हे नं.५४८५०९.३४ चौ.मी.
मनपा हद्दीतीतील फायर ब्रिगेड हे विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेत नेऊन ते सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी पदमपुरा येथे मुख्यालय बांधण्याचे काम सुरू आहे.
४त्याचे काम अजून बाल्यावस्थेतच असताना ते कॉम्प्लेक्स गहाण ठेवण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. हे केंद्र होण्यापूर्वीच गहाण राहण्याची आपत्ती त्याच्यावर आली आहे.