शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

असहाय्य विधवा महिलेवर बलात्कार, नंतर मुलीचाही केला विनयभंग; नराधम आरोग्य अधिकारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 13:42 IST

crime news, rape on the widow in Aurangabad : डॉक्टर ओळखीचा असल्यामुळे घरातील लहान मोठ्या कामासाठी ती त्याची मदत घेत.

ठळक मुद्दे पिडीतेच्या पतीचे सात वर्षापूर्वी निधन झाले.बदनामीची करीन अशी धमकी देऊन ५ वर्ष बलात्कार पिडितेच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

औरंगाबाद: ओळखीच्या विधवा महिलेवर पाच वर्षापासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम डॉक्टरला क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. आरोपी डॉक्टर हा जिल्हा परिषदेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी आहे. डॉ. प्रदीप काशीनाथ जाईबहार (रा. श्रीनिकेतन कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार पिडीतेच्या पतीचे सात वर्षापूर्वी निधन झाले. तो तिच्या ओळखीचा असल्यामुळे घरातील लहान मोठ्या कामासाठी ती त्याची मदत घेत. २०१५ मध्ये आंबेडकर जयंतीच्या दिवशी रात्री पिडितेची मुले मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर गेली होती. तेव्हा पिडीता घरी एकटी असल्याची संधी साधून पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या जाईबहारने तिच्यावर प्रथम बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर बदनामी करीन अशी धमकी देउन तो निघून गेला. यानंतर सलग पाच वर्षापासून तो तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत होता.

दरम्यान त्याने पिडितेच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीने तक्रारदार यांना सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने २ डिसेंबर रोजी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून आरोपीच्या अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांनी रात्री उशीरा तिची तक्रार नोंदवून घेत आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जी. पी. सोनटक्के यांनी अवघ्या काही तासांत आरोपी प्रदीप ला बेड्या ठोकल्या. 

आरोपी प्रदीपला एसीबीने केली होती अटक आरोपी डॉ. प्रदीप जाईबहार याला लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. यामुळे सुमारे वर्षभर तो निलंबित होता. दरम्यान त्याचे निलंबन रद्द करून तो जिल्हा परिषदेते पुन्हा आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झाला होता. दरम्यान आता पुन्हा त्याला बलात्कार आणि विनयभंगाच्या गुंह्यात त्याला अटक झाल्यामुळे पुन्हा त्याला  निलंबित केले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर