महापौरपदासाठी शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:05 IST2017-10-06T01:05:27+5:302017-10-06T01:05:27+5:30
महापौरपदाच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांचे नाव जाहीर झाले आहे

महापौरपदासाठी शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापौरपदाच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांचे नाव जाहीर झाले आहे. विद्यमान महापौर भाजपचे भगवान घडमोडे यांचा कार्यकाळ २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे. भाजप आणि शिवसेना युतीमध्ये झालेल्या करारानुसार पुढील अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा महापौर असेल. शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी मागील काही दिवसांत चर्चा होती. या चर्चेला घोडेले यांच्या उमेदवारीमुळे विराम मिळाला. महापौरपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी घोडेले यांच्यासह विकास जैन आणि रावसाहेब आमले यांची नावे चर्चेत होती. या स्पर्धेत घोडेले यांनी बाजी मारली. घोडेले यांनी गुरुवारी रात्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी घोडेले यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविल्याची माहिती आहे. यावेळी शिवसेनेचे खा. संजय राऊत, खा. चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर यांची उपस्थिती होती.