सूर्याभोवतीच्या वर्तुळाचे नांदेडकरांनी घेतले दर्शन
By Admin | Updated: July 13, 2014 00:25 IST2014-07-13T00:14:30+5:302014-07-13T00:25:22+5:30
नांदेड : काळ्या ढंगाची प्रतिक्षा असलेल्या नांदेडकरांना आज सूर्या सभोवतालच्या इंद्रधनुष्याने आकर्षित केले़ सूर्याच्या या विलोभणीय दृष्याचा आंनद नागरिकांनी दुपारपर्यंत घेतला़
सूर्याभोवतीच्या वर्तुळाचे नांदेडकरांनी घेतले दर्शन
नांदेड : काळ्या ढंगाची प्रतिक्षा असलेल्या नांदेडकरांना आज सूर्या सभोवतालच्या इंद्रधनुष्याने आकर्षित केले़ सूर्याच्या या विलोभणीय दृष्याचा आंनद नागरिकांनी दुपारपर्यंत घेतला़ वातावरणातील बदलामुळे हे दृष्य निर्माण झाल्याचे खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले़
तीन नक्षत्र कोरडे गेल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळकडे लागले आहेत़ दररोजच्या कोरड्या वातावरणामुळे पावसाचा अंदाज लागत नाही़ अशा वेळी शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून सूर्याची वेगळी प्रतिमा लोकांना पाहण्यास मिळाली़ सूर्या सभोवताली वर्तुळाकार तयार झाल्यामुळे जो - तो आभाळाकडे पाहू लागला़ साधारणपणे १२ वाजेपर्यंत हे दृष्य पाहण्यास मिळाले़
यासंदर्भात खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर म्हणाले, आकाशात सूर्या भोवती झालेले या रिंगणास विज्ञानात हेलो सूर्य म्हणतात़ पृथ्वीच्या वायुमंडळातील बर्फाची ढगे सूर्याभोवती जमा होतात़ या ढगातून २२ डिग्री अंशाच्या कोनातून जेव्हा सूर्याची किरणे बाहेर पडतात, तेव्हा सूर्याच्या भोवतील इंद्रधनुष्यासारखे वलय तयार होते़ याला सूर्य हेलो म्हणतात़ शहरात गाडीपुरा, देगलूरनाका, सराफा, होळी, श्रीनगर, नवामोंढा, गोकुळनगर, शिवाजीनगर व इतर परिसरातील या दृष्याचा आनंद नागरिकांनी घेतला़ अनेकांनी काळ्या काचेतून हे दृष्य पाहिले़ (प्रतिनिधी)