नांदेड-पुणे एक्स्प्रेस धावणार आता आठवड्यातून तीन दिवस
By Admin | Updated: August 21, 2014 23:18 IST2014-08-21T23:11:29+5:302014-08-21T23:18:52+5:30
पूर्णा : नांदेड-पुणे एक्स्प्रेस आठवड्यातून एक दिवस धावत होती. परंतु आता आठवड्यातून तीन फेऱ्या होणार असून या बाबतचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून घेण्यात आला

नांदेड-पुणे एक्स्प्रेस धावणार आता आठवड्यातून तीन दिवस
पूर्णा : नांदेड-पुणे एक्स्प्रेस आठवड्यातून एक दिवस धावत होती. परंतु आता आठवड्यातून तीन फेऱ्या होणार असून या बाबतचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून घेण्यात आला असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.
नांदेड-पुणे व पुणे-नांदेड (गाडी क्रमांक १७६१३-१७६१४) ही एक्स्प्रेस रेल्वे गेल्या अनेक वर्षापासून आठवड्यातून एक वेळेस धावत होती. या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या व मागणी लक्षात घेता आता या रेल्वे गाड्याच्या आठवड्यातून तीन फेऱ्या होणार आहेत. दर सोमवार, बुधवार, शुक्रवार नांदेड-पुणे एक्स्प्रेस ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री ९ वाजता सुटणार आहे.
दुसऱ्या दिवशी सदरील रेल्वे गाडी सकाळी ११ वाजता पुणे रेल्वेस्थानकावर पोहचणार आहे. तर परतीचा प्रवास पुणे-नांदेड (गाडी क्रमांक १७६१४) ही रेल्वे पुणे येथून महिन्याच्या दर मंगळवार, गुरुवार व शनिवार रात्री ७.५५ वाजता पुुणे येथील रेल्वेस्थानकावरून नांदेडकडे रवाना होणार आहे.
यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची सोय होणार असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)