नांदेडचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
By Admin | Updated: August 17, 2014 00:55 IST2014-08-17T00:51:00+5:302014-08-17T00:55:18+5:30
नांदेड :महापौरपदाच्या पुढील अडीच वर्षांसाठी आरक्षण घोषित झाले असून नांदेड - वाघाळा महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव सोडण्यात आले

नांदेडचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
नांदेड :महापौरपदाच्या पुढील अडीच वर्षांसाठी आरक्षण घोषित झाले असून नांदेड - वाघाळा महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव सोडण्यात आले आहे़ ३० एप्रिल २०१५ पूर्वी ही निवड करण्यात येणार आहे़
पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले़ सध्याच्या महापौरांचा कार्यकाळ ३० एप्रिल २०१५ पर्यंत आहे़ तत्पूर्वी नवीन महापौरांची निवड करण्यात येणार आहे़ महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ४२ महिलांना उमेदवारी दिली होती़ त्यापैकी २१ महिला विजयी झाल्या़ या महिला सदस्यांना महापौरपदावर विराजमान होण्याची संधी प्राप्त झाली आहे़ शनिवारी महापौरपदासाठी मुंबई येथे सोडत घेण्यात आली़ त्यात नांदेडचे महापौरपद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव असल्याचे स्पष्ट झाले़ (प्रतिनिधी)