नांदेड विभागास जुलैमध्ये मिळाले ९०़४० टक्के गुण
By Admin | Updated: September 6, 2014 00:28 IST2014-09-06T00:24:03+5:302014-09-06T00:28:06+5:30
नांदेड : एसटी महामंडळाच्या वतीने दर महिन्याला आगार आणि विभागाच्या कामाचे गुणांकन केल्या जाते़ या गुणांकण पद्धतीत गत चार महिन्यांपासून नांदेड विभाग पहिल्या पाचमध्ये राहत आहे़

नांदेड विभागास जुलैमध्ये मिळाले ९०़४० टक्के गुण
नांदेड : एसटी महामंडळाच्या वतीने दर महिन्याला आगार आणि विभागाच्या कामाचे गुणांकन केल्या जाते़ या गुणांकण पद्धतीत गत चार महिन्यांपासून नांदेड विभाग पहिल्या पाचमध्ये राहत आहे़ जुलैच्या रेटींगमध्ये विभागास ९०़४० गुण मिळाले आहेत़
एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्यातदेखील मराठवाड्यात नांदेड विभागाने गुणांचा उच्चांक शाबूत ठेवला आहे़ विभाग आणि विभागातील मे महिन्याच्या गुणांकनामध्ये औरंगाबाद प्रदेशातील उस्मानाबाद विभागाने ९३ गुण घेवून प्रथमस्थान पटकावले तर नांदेड विभागाने ९२ गुण घेत दुसऱ्या क्रमांक प्राप्त केला होता़ एसटी महामंडळाच्या वतीने सर्व विभाग आणि आगाराच्या मासिक कार्याचा अहवाल एसटी प्रशासनाकडे पाठविण्यात येतो़ विभागातील गाडीचा वापर, खर्च, प्रतिकिलोमीटर उत्पन्न, रद्द किलोमीटर, डिझेलवर झालेला खर्च, नवीन आणि जुन्या टायर्सवरील खर्च, विभागाचे अपघात, भारमान आदींना गुण देण्यात येतात़ विभागामध्ये गत काही महिन्यापासून सदरील नियमावलीचे तंतोतत पालन करून उत्पन्नवाढीसाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करीत आहेत़ हे मागील चार महिन्यांच्या गुणांवरून स्पष्ट होते़
एप्रिल महिन्यापासून नांदेड विभाग गुणांकणामध्ये पहिल्या पाचमध्ये राहत आहे़ एप्रिलमध्ये यात्रा आणि लग्नसराई, सुट्ट्यांचा हंगाम असल्याने उत्पन्न अधिक झाले होते़ त्यामुळे एप्रिलमध्ये विभागास ९३़६ गुण मिळाले होते़ मे महिन्यातही औरंगाबाद प्रदेशात द्वितीय क्रमांक पटकावल्याचे नियंत्रक बालासाहेब घुले यांनी सांगीतले़ (प्रतिनिधी)