शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाना पटोले मोदींना घाबरत नाही, तर आणखी कुणाला घाबरण्याचे कारण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 19:23 IST

Nana Patole : आता ‘फिरसे काँग्रेस’; नाना पटोले यांची घोषणा

औरंगाबाद : पुसला जात असलेला इतिहास नव्या पिढीसमोर नेण्याची गरज आहे. काँग्रेसचा ( Congress ) विचार संपवण्याचा प्रयत्न होतोय. या देशाची लोकशाही, एकात्मता व संविधान संपवण्याचा प्रयत्न होत आहे. फाळणी दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. धर्माच्या नावाने विभागणी करण्याचे प्रयत्न होत आहेत. नाना पटोले ( Nana Patole ) मोदींना घाबरत नाही, तर आणखी कुणाला घाबरण्याचे कारण नाही, असे सांगत आता ‘फिरसे काँग्रेस’ असा नारा सोमवारी येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ते तापडिया नाट्य मंदिरात ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करताना बोलत होते. ( Nana Patole is not afraid of Modi, there is no reason to be afraid of anyone else) 

ओबीसींना अधिकार देणारा तू कोण? ते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले, असा टोला पट़ोले यांनी मारताच टाळ्यांचा कडकडाट झाला. इकडे दाढीवाले झेंडा फडकवताहेत आणि चीन भारताची जमीन बळकावताहेत. गोरे गेले, पण हे परवडत नाही, असे लोक म्हणताहेत. मी थोडे दिवस राहिलो त्यांच्याबरोबर. हे सरकार या शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार नाही, अशी टीका पटोले यांनी केली.

सकाळी १०-३० वाजताच्या या कार्यक्रमात दुपारी १२-३९ वा. तापडिया नाट्य मंदिरात पट़ोले यांचे आगमन झाले. तत्पूर्वी शहरातील महामानवाच्या पुतळ्यांना म़ोटारसायकल रॅलीव्दारे त्यांनी अभिवादन केले. तापडिया नाट्य मंदिरात स्वातंत्र्य लढ्याची चित्रफीत दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला एकही मंत्री उपस्थित नसल्याची चर्चा ह़ोती. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. वारंवार सूचना करूनही मंचावरची गर्दी कमी होत नव्हती. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

मंचावर शिवाजीराव मोघे, अ.भा. सचिव संपतकुमार, चंद्रकांत हंडोरे, अतुल ल़ोंढे, एम. एम. शेख, आमदार कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, संजय राठोड, मीना शेळके, उत्तमसिंग पवार, सुभाष झांबड, अनिल पटेल, सरोज मसलगे, विलासबापू औताडे, डॉ. जितेंद्र देहाडे, नामदेव पवार, महेंद्र रमंडवाल, निमेश पटेल, मुजफ्फर खान पठाण, नंदकिशोर वजन, डॉ. अरुण शिरसाट, अभय छाजेड, सय्यद अक्रम, सीमा थोरात, पापा मोदी, सुरेखा पानकडे आदींची उपस्थिती होती.

'त्या' घोषणा मी ऐकल्याच नाही; बीड जिल्ह्यातील प्रकारावर मंत्री भागवत कराड यांचे पांघरूण

जागेवर जाऊन सत्कार...स्वातंत्र्य सैनिक समोरच्या पहिल्या दोन रांगांमध्ये बसलेले होते. थेट त्यांच्यापर्यंत प़ोहोचून नाना पटोले यांनी त्यांचा सत्कार केला. शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह दिले व त्यांच्या पाया पडून अभिवादन केले. ‘व्यर्थ न हो बलिदान’ हा आजचा नववा कार्यक्रम होता. सध्याचे सरकारने खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. लोकांसमोर खरा इतिहास मांडण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक सांडू पाटील कराळे यांनी मनोगत व्यक्त केले. देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य म्हणून माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी विविध मागण्या सादर केल्या. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कल्याण काळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद