दुरुस्तीच्या नावाखाली शहरात अघोषित भारनियमन सुरू

By Admin | Updated: April 7, 2015 01:27 IST2015-04-07T01:07:10+5:302015-04-07T01:27:16+5:30

औरंगाबाद : महावितरण शहर भारनियमनमुक्तच्या नावाखाली वीज ग्राहकांकडून अधिक दराने वीज बिल वसूल करीत आहे. शहरातील अनेक भागांत देखभाल दुरुस्ती,

In the name of repairs, unannounced surcharge in the city | दुरुस्तीच्या नावाखाली शहरात अघोषित भारनियमन सुरू

दुरुस्तीच्या नावाखाली शहरात अघोषित भारनियमन सुरू


औरंगाबाद : महावितरण शहर भारनियमनमुक्तच्या नावाखाली वीज ग्राहकांकडून अधिक दराने वीज बिल वसूल करीत आहे. शहरातील अनेक भागांत देखभाल दुरुस्ती, लाईन खराब होणे, झाडांची छाटणी इत्यादी कामांच्या नावाखाली वीजपुरवठा तासन्तास बंद ठेवला जात
आहे.
कंपनी भारनियमनमुक्त शहराप्रमाणे २४ तास वीजपुरवठा करीत नसल्यामुळे दररोज वीज ग्राहकांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाच्या पाहऱ्यात नागरिकांना गर्मीचा सामना करावा लागत आहे.
शहरात २ लाख ४५ हजार वीज ग्राहक आहेत. महावितरणने शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेऊन तीन महिने झाले तरी वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.
शहरातील अनेक भागांतील विद्युत खांब आणि वीज वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे खांबांचे पडण्याचे आणि तारा तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, विविध भागांतील वीजपुरवठा खंडित होत आहे.

Web Title: In the name of repairs, unannounced surcharge in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.