शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

Namantar Andolan : ‘वसंतराव नाईक महाविद्यालय तर नामांतर चळवळीचे केंद्र बनले होते’ : राजाराम राठोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 3:45 PM

लढा नामाविस्ताराचा : त्यावेळी मी प्राचार्य मतदारसंघातून विद्यापीठ एक्झिक्युटिव्ह काऊन्सिलवर निवडून गेलो होतो. मला दिवंगत वसंतराव काळे व तरुण प्राध्यापकांचा मोेठा पाठिंबा राहिला. ईसीमध्ये बाबासाहेबांच्या नावाचा ठराव मांडण्याची संधी मला मिळाली. मी स्वत:ला धन्य समजतो. तसेच माझे महाविद्यालय नामांतर चळवळीचे केंद्र बनले, याचाही सार्थ अभिमान आहे. मिलिंद महाविद्यालयही नामांतर चळवळीचे केंद्र बनले होते, असे त्यांनी सांगितले.

- स. सो. खंडाळकर

वसंतराव नाईक महाविद्यालय तर शंभर टक्के नामांतरवादी होते. किंबहुना ते नामांतर चळवळीचे मुख्य केंद्र बनले होते. याचा मला काल, आज आणि उद्याही अभिमान आहे, अशा शब्दांत या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजाराम राठोड यांनी आपली बांधिलकी जाहीर केली. राजाराम राठोड हे आज वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.

राठोड यांनी प्रारंभापासूनच पुरोगामी विचारसरणीशी आपली नाळ घट्ट करून ठेवली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक हा नामांतरवादी होता. इतकेच नाही तर नामांतर लढ्याच्या अग्रभागी होता. दिवंगत प्रा. बापूराव जगताप, कबीरांच्या दोह्यांचे गाढे अभ्यासक प्रा. मोतीराज राठोड, प्रा. सुरेश पुरी, दिवंगत प्रा. जवाहर राठोड आदींनी, तर नामांतर चळवळीत सक्रिय सहभाग घेत नेतृत्वही केले. या सहभागातूनच प्रा. बापूराव जगताप यांनी ‘निळ्या पहाडाच्या कविता’ साकारल्या. मोतीराज आणि जवाहर राठोड यांनीही विपुल साहित्य लिहिले. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकमतशी बोलताना प्राचार्य राठोड यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. 

१९७७ साली विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काऊन्सिलमध्ये नामांतराचा ठराव मंजूर झाल्यानंतर एक्झिक्युटिव्ह काऊन्सिलमध्ये हा ठराव मी मांडला. त्याला अहमदपूरचे किशनराव देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी शिवाजीराव  भोसले नव्हे तर दुसरे भोसले हे कुलगुरू होते. हे सारे रेकॉर्डवर आहे. एमसी आणि ईसीमध्ये ठराव मंजूर झाल्यानंतर नामांतर होईल, असा एक समज; परंतु तो खरा नव्हता. त्याकाळी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. विद्यापीठात ठराव मंजूर झाल्यानंतर राज्याच्या विधिमंडळात हा ठराव २७ जुलै १९७८ रोजी मंजूर झाला आणि या ठरावाचे स्वागत होण्याऐवजी दंगली उसळू लागल्या. दलितांच्या घरादारांची राखरांगोळी सुरू झाली. हे सारेच मोठे दु:खदायी. वेदना देणारे होते, असे राजाराम राठोड यांनी नमूद केले.  नामांतराच्या निमित्ताने अन्याय-अत्याचाराच्या घटना कानावर येत होत्या. अत्याचारग्रस्तांना मदत व्हावी या भूमिकेतून आमची धडपड चाललेली असायची. अ‍ॅड. अंकुश भालेकर यांच्या गावापर्यंत जाऊन आम्ही ही मदत पुवरली होती, अशी आठवण राजाराम राठोड यांनी सांगितली.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा