नळदुर्गमध्ये कासार यांच्या नावावर शिक्कामोर्तब !

By Admin | Updated: December 31, 2016 00:15 IST2016-12-31T00:14:00+5:302016-12-31T00:15:46+5:30

नळदुर्ग : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नितीन कासार यांची बिनविरोध निवड झाली

Naladurgera Kesar's name! | नळदुर्गमध्ये कासार यांच्या नावावर शिक्कामोर्तब !

नळदुर्गमध्ये कासार यांच्या नावावर शिक्कामोर्तब !

नळदुर्ग : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नितीन कासार यांची बिनविरोध निवड झाली असून, स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी पक्षाकडून मुश्ताक कुरेशी, तर काँग्रेस पक्षाकडून विनायक अहंकारी यांची निवड करण्यात आली. न.प. सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेच्या पीठासीन अधिकारीपदी नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे या होत्या.
राष्ट्रवादीचे नितीन कासार यांचा एकमेव अर्ज उपाध्यक्षपदी होता. यावेळी कासार यांनी दोन नामनिर्देशन फॉर्म भरले होते. महालिंग स्वामी, दयानंद बनसोडे यांनी सूचक, तर असिफाबेगम काझी व भारती बनसोडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या होत्या. नितीन कासार हे मागील पंचवार्षिक काळात काँग्रेस पक्षाकडून एक वर्षे नगराध्यक्ष होते. दरम्यान, त्यांच्यात व श्रेष्ठीत मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पालिका निवडणूक लढविली होती. स्वीकृत सदस्यपदी निवड झालेले मुश्ताक कुरेशी हे माजी नगराध्यक्ष असून या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीकडून मुश्ताक कुरेशी व महेबूब शेख यांनी नामनिर्देशन भरले होते. या दोघांपैकी मुश्ताक कुरेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर काँग्रेस पक्षाकडून विनायक अहंकारी यांचे एकट्याचेच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

Web Title: Naladurgera Kesar's name!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.