नळदुर्गचे ‘एपीआय’ जेरबंद

By Admin | Updated: April 8, 2015 00:50 IST2015-04-08T00:44:27+5:302015-04-08T00:50:01+5:30

नळदुर्ग : दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्जावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘से’ दाखल केला म्हणून व दाखल गुन्ह्यात मदत करतो म्हणून

Naladurga 'API' Jeriband | नळदुर्गचे ‘एपीआय’ जेरबंद

नळदुर्गचे ‘एपीआय’ जेरबंद


नळदुर्ग : दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्जावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘से’ दाखल केला म्हणून व दाखल गुन्ह्यात मदत करतो म्हणून चौकीदार प्रभाकर गवळी याच्यामार्फत ८ हजार रूपयाची लाच घेणाऱ्या नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप सरवदे यांना ‘एसीबी’ने रंगेहात जेरबंद केले़ ही कारवाई मंगळवारी सकाळी नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आली असून, या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदाराचे वडील व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य अशा १६ जणांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुरनं़३३/१५ भादंवि कलम ३०७, ५०४, ५०६, ३२३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल झाला होता़ या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप दगडोबा सरवदे यांच्याकडे होता़ या गुन्ह्यातील ११ आरोपितांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता़ त्यावेळी यातील ९ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला़ तर दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता़ त्यानंतर तक्रारदारांच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अपील अर्ज केला होता़ या प्रकरणात तपासाधिकारी सपोनि सरवदे यांनी न्यायालयात ‘से’ दाखल करण्यासाठी व प्रकरणात पुढील मदत करण्यासाठी ५० हजार रूपये लाचेची मागणी केली़ तडजोडी अंती ३० हजार रूपये देण्याचे ठरले़ त्यावेळी काही रक्कम घेतल्यानंतर १ एप्रिल रोजी सरवदे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘से’ दाखल केला होता़ त्यानंतर उर्वरित ८००० रूपये द्यावेत, यासाठी त्यांनी सतत तगादा लावल्याने तक्रारदाराने उस्मानाबाद येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ या तक्रारीची दखल घेत उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी ‘एसीबी’चे पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, प्ऱ अप्पर पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी सकाळी सापळा रचला़ त्यावेळी तक्रारदाराकडे सपोनि दिलीप सरवदे यांच्या मार्फत चौकीदार प्रभाकर बंडू गवळी याने लाचेची मागणी करून ८००० रूपये स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ तपास उपाधीक्षक अश्विनी भोसले या करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Naladurga 'API' Jeriband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.