नायब तहसीलदाराच्या श्रीमुखात भडकावली

By Admin | Updated: May 27, 2015 00:41 IST2015-05-27T00:18:27+5:302015-05-27T00:41:56+5:30

केज : सुटीवर गावी आलेल्या सैनिकाने महिला नायब तहसीलदाराच्या श्रीमुखात भडकाविल्याचा खळबळजनक प्रकार येथील तहसील कार्यालयात घडला. या प्रकरणी पोलिसांनी सैनिकाला अटक केली आहे.

Nahab Tehsildar's Shankar Muktawala | नायब तहसीलदाराच्या श्रीमुखात भडकावली

नायब तहसीलदाराच्या श्रीमुखात भडकावली


केज : सुटीवर गावी आलेल्या सैनिकाने महिला नायब तहसीलदाराच्या श्रीमुखात भडकाविल्याचा खळबळजनक प्रकार येथील तहसील कार्यालयात घडला. या प्रकरणी पोलिसांनी सैनिकाला अटक केली आहे.
नायब तहसीलदार आशा वाघ या तहसील कार्यालयामध्ये नित्याप्रमाणे आपल्या दालनात काम करत होत्या. यावेळी सैन्यदलात कार्यरत व तरनळी येथील रहिवासी रोहिदास खामकर हे आले. हयातीच्या प्रमाणपत्राची त्यांनी नायब तहसीलदार वाघ यांच्याकडे मागणी केली. त्यासाठी पत्नीला समक्ष हजर करा, असे आदेश वाघ यांनी सोडले. त्यानंतर खामकर व वाघ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. संतप्त खामकर यांनी नायब तहसीलदार वाघ यांच्यावर हात उचलला. त्यांच्या गालावर चापट मारल्यानंतर इतर कर्मचारी धावले. काही कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. फौजदार आनंदराव वाटोरे हे फौजफाटा घेऊन तहसीलमध्ये दाखल झाले. त्यांनी खामकर यांना ताब्यात घेतले. आशा वाघ यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा, मारहाण करणे, धमक्या देणे या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. सैन्यदलाकडे अहवाल पाठवू, असे निरीक्षक नानासाहेब लकाळ म्हणाले.(वार्ताहर)
नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.
४बुधवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात येणार आहे.
४शासकीय व निमशासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी असुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्ष़ेसाठी प्रशासनाने उपाय करण्याची मागणी मानवी हक्क अभियानच्या सीता बन्सोड यांनी केली आहे.

Web Title: Nahab Tehsildar's Shankar Muktawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.