नागझरीत जि.प. शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
By Admin | Updated: June 24, 2017 23:39 IST2017-06-24T23:36:14+5:302017-06-24T23:39:29+5:30
लिंबागणेश : नागझरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वेळेवर येत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकले

नागझरीत जि.प. शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
लिंबागणेश : नागझरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वेळेवर येत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकले. शनिवारीही शिक्षक उशिरा आले होते.
बीड तालुक्यातील नागझरी येथे पहिली ते चौथी पर्यंत जि.प.शाळा असून विद्यार्थी संख्या २१ एवढी आहे. गतवर्षी हीच संख्या ७४ एवढी होती. यावर्षी तर पहिलीच्या वर्गात अद्याप एकही प्रवेश झालेला नाही. शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत, आले तरी शिकवत नाहीत, तसेच शिक्षकांतील अंतर्गत वाद हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करीत आहेत. याबाबत पालकांनी वारंवार तक्रार केली, परंतु कोणीच दखल घेतली नाही, अखेर संतप्त पालकांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकले. विशेष म्हणजे शनिवारीही शाळेत केवळ एकच शिक्षक आला आणि तोही ११ वाजण्याच्या सुमारास. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
मुख्याध्यापिका एस.एल.ससाणे म्हणाल्या, चार वर्ग व शाळेची कामे असल्याने मला विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे अवघड होते. बैठक, कार्यक्रम, आदी कामांमुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.