नगरसोल-नांदेड पँसेजरचे इंजिन फेल
By Admin | Updated: October 31, 2014 00:34 IST2014-10-31T00:16:34+5:302014-10-31T00:34:07+5:30
जालना : नगरसोल-नांदेड ही पँसेजर रेल्वेगाडी करमाड स्थानकात आल्यानंतर इंजिन निकामी झाले. त्यामुळे नांदेड-मनमाड मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली

नगरसोल-नांदेड पँसेजरचे इंजिन फेल
जालना : नगरसोल-नांदेड ही पँसेजर रेल्वेगाडी करमाड स्थानकात आल्यानंतर इंजिन निकामी झाले. त्यामुळे नांदेड-मनमाड मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. मात्र जालना रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. स्थानक प्रमुखांनी तात्काळ उपाय योजना केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.
करमाड येथे बंद पडलेल्या या गाडीतील प्रवाशांचाही प्रचंड खोळंबा झाला. शिवाय विविध स्थानकातही तब्बल तीन ते चार तास प्रवासी अडकले. ही गाडी जालन्यात सकाळी ८.१० वाजता येणार होती. मात्र सकाळी १०.३० वाजता जालन्यात येणारी मनमाड काचीगुडा पँजेजर करमाडला आली. त्यात बंद पडलेल्या गाडीतील प्रवासी बसविण्यात आले. जालन्यातही स्थानक प्रमुख विजयकुमार वळवी व उपस्थानक प्रमुख संजयकुमार यांनी सर्वच प्रवाशांना आवाहन करून काचीगुडा पँसेजरमध्ये बसण्याचे आवाहन केले.
या दरम्यान नांदेड-मनमाड धावणाऱ्या एक्स्प्रेसला औरंगाबादकडे पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)