नगर पंचायतीत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी

By Admin | Updated: May 16, 2016 23:51 IST2016-05-16T23:47:31+5:302016-05-16T23:51:26+5:30

लोहारा : येथील नगरपंचायतीच्या दोन स्वीकृत नगरसेवकांसह विविध समितीचे सभापती व उपसभापती तसेच सदस्यांच्या निवडी सोमवारी पार पडल्या.

Nagar Panchayatan Samiti is the choice of office bearers | नगर पंचायतीत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी

नगर पंचायतीत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी

लोहारा : येथील नगरपंचायतीच्या दोन स्वीकृत नगरसेवकांसह विविध समितीचे सभापती व उपसभापती तसेच सदस्यांच्या निवडी सोमवारी पार पडल्या.
नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पौर्णिमा लांडगे तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नाजमीन शेख यांची निवड झाल्यानंतर सोमवारी दोन स्वीकृत नगरसेवक तसेच महिला व बालकल्याण, बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य व दिवाबत्ती, कर संकलन तसेच विकास, नियोजन व शिक्षण समिती सभापती, सदस्य निवडीसाठी सोमवारी बैठक बोलाविण्यात आली होती. पिठासन अधिकारी म्हणून तहसीलदार ज्योती चौहान यांनी काम पाहिले. यावेळी स्वीकृत सदस्यपदासाठी शिवसेनेकडून फरहत कलीम खुटेपड व अतिउल्लाखाँ नवाबखाँ पठाण तर राष्ट्रवादी कॉग्रेसकडून आयुब अब्दुल शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर शिवसेनेच्या फरहत कलीम खुटेपड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे दोन जागेसाठी दोनच अर्ज राहील्याने राष्ट्रवादीचे आयुब शेख व शिवसेनेचे अतिउल्लाखाँ पठाण यांची स्वीकृत्त नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे पिठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर समित्या निवडण्यात आल्या. यात महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी जयश्री वाघमारे, उपसभापतीपदी ज्योती मुळे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी अबुलवफा कादरी, सार्वजनिक पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी प्रताप घोडके, आरोग्य व दिवाबत्ती समिती सभापतीपदी सुनिता ढगे तर सार्वजनिक कर संकलन, विकस, नियोजन व शिक्षण समितीच्या सभापतीपदी उपनगरध्यक्ष नाजमिन शेख यांची निवड करण्यात आली. नगरध्यक्षा पोर्णिमा लांडगे या स्थायी समितीच्या पदसिध्द सभापती राहणार असून, सर्व समित्यांचे सभापती हे सदस्य राहणार आहेत. यावेळी पिठासन अधिकारी तथा तहसीलदार ज्योती चौहान, मुख्यधिकारी मुस्तफा खोंदे, नगरध्यक्ष पोर्णिमा लांडगे, उपनगरध्यक्ष नाजमिन शेख यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थितीत होते.
दरम्यान, या समितीच्या निवडीपूर्वी गटनेत्यांची निवड प्रक्रिया पार पडली. यात शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी अभिमान खराडे, काँग्रेस गटनेतेपदी आरीफ खानापुरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी गगन माळवदकर यांची निवड करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Nagar Panchayatan Samiti is the choice of office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.