माझं नेतृत्व स्वयंभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:00 IST2017-08-13T00:00:32+5:302017-08-13T00:00:32+5:30
माझं नेतृत्व स्वयंभू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी सावरगाव घाट येथे केले.

माझं नेतृत्व स्वयंभू
लोकमत न्यूज नेटवर्क
कुसळंब : अनेक संकटे झेलत भगवानबाबांनी जगण्याची शिकवण दिली, तर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वंचितांचे रक्षण केले. माझ्याकडे अपेक्षेने पाहणाºया समाजाला आयुष्यात कधी कुणाच्या दावणीला बांधणार नाही. माझं नेतृत्व स्वयंभू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी सावरगाव घाट येथे केले.
पाटोदा तालुक्यातील सावरगाव (घाट) येथे आयोजित राष्ट्रसंत भगवानबाबा जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमात पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी आ. भीमराव धोंडे, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, जि.प.सभापती संतोष हंगे, युधाजित पंडित, माजी आ. केशवराव आंधळे, पाटोदा पंचायत समिती सभापती पुष्पा सोनवणे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील आळंदीकर, ह.भ.प. बुवासाहेब खाडे महाराज, विजय गोल्हार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौकाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांनी केले. त्यानंतर जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कीर्तनाचा त्यांनी लाभ घेतला. संत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, आदर्श समाजनिर्मितीसाठी संघर्ष अपरिहार्य असल्याचे सांगून स्व.मुंडेंनी वंचित समाजाचे नेतृत्व केले. त्यांनीच समाजाला ओळख दिली.
मी विकासाचे, न्यायाचे, सत्यांचे आणि स्वयंभू राजकारण करते, असे सांगितले. तसेच बीड जिल्ह्याचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण केले. पित्याचा वारसा चालवू शकते, हा विश्वास जनतेनेच दिला. मी सावरगावची लेक झालेय, नाथ्रापेक्षाही मला इथे अधिक आनंद होतोय. तुमच्यावर पितृछत्र धरण्याची ताकद भगवानबाबांनी द्यावी, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय गोल्हार, सूत्रसंचालन वि. भा. साळुंके, युवराज वायबसे, शंकरे देशमुख, प्रा. बिभीषण चाटे यांनी केले तर आभार बी. टी. खाडे यांनी मानले.
यावेळी ह.भ.प. बुवासाहेब खाडे महाराज, जि. प. सदस्य सतिश शिंदे, मधुकर गर्जे, रमेश पोकळे, उध्दव दरेकर, आदिनाथ सानप, शिवनाथ पवार, सुधीर घुमरे, रामदास बडे, संदीप सानप, प्रा. वसंत सानप, सुदाम सानप, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, तहसिलदार रामेश्वर गोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल भोकरे, उद्धव दरेकर, सत्यसेन सोनवणे, ज्ञानेश्वर जरांगे, बडे, उद्योगपती खटके, नाना ठोंबरे, शिवनाथ पवार, अॅड. सुधिर घुमरे, मधुकर गर्जे, आबासाहेब पवार, प्रा.लक्ष्मण सांगळे, संतोष मानुरकर, श्रीपती माने, संतोष भालेराव, नवनाथ सानप, अरूण येवले यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.