अठरापगड जातीसाठी माझा लढा

By Admin | Updated: September 23, 2014 01:36 IST2014-09-23T01:01:27+5:302014-09-23T01:36:48+5:30

सेलू : मराठा समाजापुरता माझा लढा नसून अठरापगड जातींना सोबत घेवून त्यांचा विकास साधण्यासाठी आपण घराबाहेर पडलो आहोत़

My fight for the Athrangad cast | अठरापगड जातीसाठी माझा लढा

अठरापगड जातीसाठी माझा लढा


सेलू : मराठा समाजापुरता माझा लढा नसून अठरापगड जातींना सोबत घेवून त्यांचा विकास साधण्यासाठी आपण घराबाहेर पडलो आहोत़ येत्या काळात या समाजाला न्याय देण्यासाठी आपला लढा सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले़
शहरातील नगरपालिकेच्या श्री साई नाट्यमंदिरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित मराठा आरक्षण कृतज्ञता सोहळयात ते रविवारी बोलत होते़ अध्यक्षस्थानी प्रा़ डॉ़ उत्तम पानपट्टे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ़ रामप्रसाद बोर्डीकर, बाळू महाराज गिरगांवकर, पवन आडळकर, बी़ एस़ कोलते , जनार्दन पाटील, बालाजी शिंदे, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य छगन शेरे, अशोक भोसले यांची उपस्थिती होती़
संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे ; परंतु या आरक्षणाचा उपयोग तुमच्या परिश्रमावर अवलंबून आहे़ त्यामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवा़ जानेवारी महिन्यात काढलेल्या शिव-शाहू यात्रेत मराठवाडा, विदर्भ, खान्देश या भागातील समाजबांधवांचे मोठे प्रेम मिळाले आहे़ मराठा समाजाची मोठया भावाची भूमिका असल्यामुळे अठरा- पगड जातींना सोबत घेवून काम करण्याची गरज आहे़
इतर समाज आपल्या पासून दुखवणार नाही, याचीही काळजी समाजाने घेतली पाहिजे़ जातीभेद नष्ट करण्यासाठी माझा प्रवास आहे़ मी जरी शिवाजी महाराजांच्या रक्ताचा वारसदार असलो तरी मला त्यांच्या विचारांचा वारसदार म्हणून ओळखले पाहिजे म्हणून मी बहुजन समाजापर्यंत शिवशाहूंचे विचार पोहोचविण्याचे काम करीत आहे़ तसेच मराठा समाजाला दिशा व प्रबोधन करण्याची गरज आहे़ माझ्या पेक्षा माझी रयत मोठी झाली पाहिजे या भावनेतून आपला लढा सुरूच राहणार असल्याची संभाजीराजे भोसले यांनी स्पष्ट केले़
सूत्रसंचालन बजरंग आरकुले यांनी केले़ रणजित चव्हाण यांनी आभार मानले़ कार्यक्रमासाठी रामेश्वर शेरे, महेश मुसळे, शशांक टाके, सचिन रोडगे, अरूण काष्टे, विक्रम पवार, संतोष शिंदे, शिवाजी मोकाटे, श्रीराम डासाळकर, शिवाजी पांचाळ, राहुल मेहता, अतिश आळणे, अमोल शेवाळे, संदीप डाके आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)

Web Title: My fight for the Athrangad cast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.