बीडकरांच्या सेवेची संधी हे माझे भाग्यच !

By Admin | Updated: May 31, 2014 00:55 IST2014-05-31T00:43:49+5:302014-05-31T00:55:56+5:30

सोमनाथ खताळ, बीड महिला असतानाही बीड शहराच्या नगराध्यक्षपदाची सूत्र जनतेने विश्वासाने माझ्या हाती दिली.

My fate is the opportunity to serve Beedkar! | बीडकरांच्या सेवेची संधी हे माझे भाग्यच !

बीडकरांच्या सेवेची संधी हे माझे भाग्यच !

सोमनाथ खताळ, बीड महिला असतानाही बीड शहराच्या नगराध्यक्षपदाची सूत्र जनतेने विश्वासाने माझ्या हाती दिली. बीडकरांनी मला शहराच्या विकासासाठी संधी दिली़ आणि मिळालेल्या संधीचे मी सोने केले, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा डॉ़ दीपा क्षीरसागर यांनी दिली़ साहित्य , संंस्कृती, शिक्षण या क्षेत्रात आपला ठसा उमटविणार्‍या डॉ. दीपा क्षीरसागर यांचा अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे, यानिमित्ताने त्यांच्याशी ‘लोकमत’ने केलेली खास बातचीत... २६ डिसेंबर २०११ रोजी नगराध्यक्ष पदावर रूजू झालेल्या डॉ. दीपा क्षीरसागर यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत शहरात अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले. आपल्या व्यक्तीमत्वातील नैपुण्य त्यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराचा कारभार हाकताना प्रत्येक छोट्या-मोठ्या कामात दाखवून दिले. वातानुकुलित गाडीत फिरणारे नगराध्यक्ष एकीकडे आणि साफसफाई दरम्यान कामगारांसोबत गल्लीबोळात फिरणार्‍या दीपा क्षीरसागर एकीकडे. नगराध्यक्ष म्हणून माझ्यावर ज्यावेळेस जबाबदारी दिली त्यावेळेस मला हे पेलेल का असा प्रश्न पडला होता. मात्र स्व.केशरकाकू क्षीरसागर यांची प्रेरणा, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे मार्गदर्शन मला लाभले. माझ्या डोळ्यासमोर फक्त बीडचा विकास कसा करता येईल? असे उद्दिष्ट होते. महिला नगराध्यक्ष म्हणून माझ्याकडून शहरातील महिलांना खूप अपेक्षा होत्या. मात्र त्यांना या माझ्यापर्यंत कशा पोहचवाव्यात? हा प्रश्न होता. महिलांचे प्रश्न सुटावेत आणि महिला प्रत्येक क्षेत्रात जोमाने, धडाडीने कशी पूढे येईल, यासाठी मी प्रयत्न केले आणि यामध्ये मला यश आल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले. राज्यात कुठल्याच नगर परिषदेने आतापर्यंन न अवलंबविलेला ‘महिला दरबार’ आणि ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ हे दोन उपक्रम महिलांच्या हक्काचे व्यासपीठ ठरले. प्रत्येक महिन्याला महिन्यात महिलांनी आपल्या समस्या नगराध्यक्षांपूढे मांडल्या. या दोन उपक्रमांमुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले . बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले. मास्टर प्लॅन, पाणी पुरवठा, पुतळ्यांचे सुशोभिकरण, मल्टी पर्पजवर क्रीडांगण, शहर बससेवा, वातानुकूलित भाजी मंडई, नाट्यगृह आदी विकास कामे झाली आणि यातील काहींसाठी प्रस्ताव पाठविला आहे. मात्र ही कामे माझ्या काळात माझ्या ‘सौभाग्या’मुळेच झाले, हे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत.

Web Title: My fate is the opportunity to serve Beedkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.