बाई माझी पोरगी खासदार झाली

By Admin | Updated: December 20, 2014 23:30 IST2014-12-20T23:30:25+5:302014-12-20T23:30:25+5:30

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई विविध रचनांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गुलाबी थंडीतही एकापेक्षा एक बहारदार कवितांच्या सादरीकरणाने निमंत्रितांच्या कविसंमेलनाने

My brother became a MP | बाई माझी पोरगी खासदार झाली

बाई माझी पोरगी खासदार झाली


अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
विविध रचनांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गुलाबी थंडीतही एकापेक्षा एक बहारदार कवितांच्या सादरीकरणाने निमंत्रितांच्या कविसंमेलनाने साहित्य संमेलनात मोठी रंगत आणली. जीवनातील व्यथा, वेदना व वास्तव स्थितीचे दर्शन उपस्थित कविंनी अंर्तरंगातून निघालेल्या कविंतामधून सादर केले.
सहाव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शुक्रवारी रात्री निमंत्रितांचे कविसंमेलन कै. डॉ. शैला लोहिया व्यासपीठावर पार पडले़ अध्यक्षस्थानी दगडू लोमटे तर गणपत व्यास, डॉ. मुकुंद राजपंखे, दिनकर जोशी, बालाजी सुतार, शहानवाज, विश्वंभर वराट, राज पठाण, वैशाली गोस्वामी, अतहर हुसेन, भागवत काचगुंडे, गोपाल तिवारी, कृष्णा भोकरे, मुमताज मुकर्रम, निशा चौसाळकर, डॉ. विजया इंगोले, शितल बोधले, संतराम कराड आदी कविंचा सहभाग होता. सूत्रसंचालन बी. आर. मसने, भागवत मसने यांनी केले.
ज्येष्ठ कवि विद्याधर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कवि संमेलन झाले. यावेळी प्रा. डॉ. विजया इंगोले यांनी ‘बाई माझी पोरगी खासदार झाली, कुणाची ही पुण्याई सावित्रीने दिला तिला आधार’ ही स्त्रीशक्तीची महती सांगणारी रचना सादर केली. उपस्थित कविंनी गझल, गिते व विविध रचना सादर केल्या. कधी हसवत तर कधी वेदनेने काळजाला हात घालीत हे कविसंमेलन उशिरापर्यंत चालले. सूत्र संचालन प्रा. विष्णु कावळे यांनी केले. आभार मुजीब काझी यांनी मानले.
यशस्वीतेसाठी डॉ.अलका सरोदे, चंदन कुलकर्णी, डॉ. विकास जाधव, विश्वास चौबे, डॉ. विनायक गडेकर, अनंत कांबळे, रविंद्र केंद्रे, डॉ. अमित लोमटे, अभिजित गाठाळ, प्रमोद बगाडे, डॉ. प्रमोद समुद्रे, संतोष बोबडे, अतुल जोगदंड यांनी परिश्रम घेतले.
खुल्या संमेलनात ४५ कविंनी सहभाग नोंदवला. संमेलनाचे संयोजन प्रा. विष्णु कावळे, सूत्रसंचालन शितल गोरे यांनी केले.

Web Title: My brother became a MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.