शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गोशाळेच्या नावाखाली नेलेल्या गाईंची परस्पर विक्री; शेतकऱ्यांनीच सापळा रचून पकडले आरोपीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:57 IST

फेसबुकवर गोशाळेसाठी गाई लागत असल्याची करत असे जाहिरात

कायगाव (छत्रपती संभाजीनगर) : शेतकऱ्यांच्या गावरान गाई गोशाळेत पालन करण्यासाठी नेऊन त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या आरोपीविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या सजगतेमुळे हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी आदेश दत्तात्रय कांदेकर (रा. दहेगाव, ता. जि. अहमदनगर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ डिसेंबर २०२२ रोजी फेसबुकवर गावरान गाई पाळण्यासाठी आणि गोमूत्र जमा करण्यासाठी नेण्याबाबत एक पोस्ट आली. ही पोस्ट अगरवाडगाव येथील अरुण बबन वाघ यांनी पाहिली. वाघ यांना त्यांच्याकडील गाई सांभाळण्यासाठी देण्याची इच्छा झाल्याने त्यांनी त्यावरील मोबाईल नंबर डायल करून आदेश कांदेकर याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आदेशने माझ्याकडे गोशाळा असून, मी गाई सांभाळतो, असा विश्वास वाघ यांना देऊन त्यांना व्हिडिओ कॉलवरून मंदिर व गोशाळा दाखविली. 

यावर विश्वास ठेवून अरुण वाघ, वैभव भाऊसाहेब म्हसरुप (दोघे रा. अगरवाडगाव), आणि विवेक भाऊसाहेब नवले (रा. गणेशवाडी) या तिन्ही शेतकऱ्यांनी त्यास गाई सांभाळण्यासाठी देण्याचे कबूल केले. आदेश पिकअप घेऊन १६ डिसेंबर २०२२ रोजी अगरवाडगाव येथे आला. शेतकऱ्यांनी त्यांच्या ३ गाई आदेश कांदेकरच्या स्वाधीन केल्या. तीन महिन्यांचा काळ लोटल्यानंतर आपल्या गाईंना पाहण्याची शेतकऱ्यांना इच्छा झाली. त्यांनी त्यासाठी आदेशला फोन केला; मात्र आदेशने मोबाईल बंद करून टाकल्याने त्याचा संपर्क होत नव्हता. यावरून अरुण वाघ आणि इतर शेतकऱ्यांना आदेशने गाईॅ परस्पर विक्री करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले.

शेतकऱ्यांनी रचला सापळा...सोमवारी (दि.१०) अरुण वाघ आणि त्यांच्या गावातील इतर मित्रांनी आदेशला पकडण्यासाठी सापळा रचला. आदेशने फेसबुकवर दुसऱ्या नावाने जाहिरात देऊन गाई सांभाळण्यासाठी देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी दुसऱ्या मोबाईल नंबरवरून त्याला गाई सांभाळण्यासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. सोमवारी सकाळी ११.३० वाजता गंगापूर तालुक्यातील ढोरेगावजवळ आदेश गाई घेण्यासाठी वाहन घेऊन आला असता, शेतकऱ्यांनी त्यास पकडले. आमच्या गाई परत दे, अशी मागणी त्याच्याकडे करण्यात आली. त्यावेळी तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. शेवटी शेतकऱ्यांनी त्यास गंगापूर पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी अरुण वाघ यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात आदेश कांदेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. भागचंद कासोदे, विजय पाखरे करीत आहेत. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, यासाठी अहमदनगर, श्रीगोंदा, राहता आणि सोलापुरात तपासासाठी पथक पाठविले जाणार आहे. आरोपीला मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

टॅग्स :FarmerशेतकरीcowगायAurangabadऔरंगाबाद