परस्पर हडपले अनुदान

By Admin | Updated: December 22, 2014 00:59 IST2014-12-22T00:47:35+5:302014-12-22T00:59:26+5:30

उस्मानाबाद : वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचे आलेले अनुदान परस्पर उचलून फसवणूक फिर्यादीची केल्याप्रकरणी त्याच्या भावासह येडशी येथील एका बँकेच्या शाखाधिकारी व इतर एकाविरूध्द

Mutual aid grants | परस्पर हडपले अनुदान

परस्पर हडपले अनुदान


उस्मानाबाद : वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचे आलेले अनुदान परस्पर उचलून फसवणूक फिर्यादीची केल्याप्रकरणी त्याच्या भावासह येडशी येथील एका बँकेच्या शाखाधिकारी व इतर एकाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मिळालेल्या माहितीनुसार, कुमाळवाडी येथील एका इसमाच्या वडिलांच्या नावे गडदेवधरी शिवारात जमीन आहे़ त्याला एक भाऊ बहिणी आहेत़ वडिलांच्या निधनानंतर सन २०१३-१४ मध्ये गडदेवधरी येथील जमिनीचे १८००० रूपये अनुदान आले होते़ हे अनुदान त्याच्या भावाने बनावट शपथपत्र तयार करून येडशी येथील एका बँकेच्या शाखेतून उचलले़
दरम्यान, शपथपत्र बनवित असताना सोनेगाव येथील एका इसमाने त्यास मदत केली व शाखाधिकाऱ्याने बँकेतील अनुदान भावाच्या नावे करून आपली फसवणूक केल्याची फिर्याद एका इसमाने उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे़ या फिर्यादीवरून भावासह तिघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक परदेशी हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Mutual aid grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.