मुस्लिम संघटनांचा मोर्चा
By Admin | Updated: July 22, 2014 00:19 IST2014-07-21T23:47:07+5:302014-07-22T00:19:06+5:30
नांदेड : पवित्र रमजान महिन्यात इस्त्राइलने पॅलेस्टाईनमध्ये सुरू केलेल्या हिंसेमुळे निरपराधांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला़
मुस्लिम संघटनांचा मोर्चा
नांदेड : पवित्र रमजान महिन्यात इस्त्राइलने पॅलेस्टाईनमध्ये सुरू केलेल्या हिंसेमुळे निरपराधांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी जुन्या नांदेडात सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला़
पवित्र रमजान महिन्यात इस्त्राइलने पॅलेस्टाईनमध्ये हिंसेचा नंगानाच सुरू केला आहे़ मानवतेला काळीमा फासणाऱ्या या हल्ल्यात निरपराध व अबालवृद्ध मारले जात आहेत़ या अघोरी कृत्यांचा निषेध करीत आज दुपारी देगलूरनाका ते ईदगाह मैदानपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला़ यामध्ये मुस्लिम समाजातील लहान - थोरांनी सहभाग घेवून आपल्या भावना व्यक्त केल्या़ या मोर्चाचे ईदगाह मैदान येथे सभेत रूपांतर झाले़ इस्लाम धर्मियांसाठी पॅलेस्टाईन ही पवित्र भूमी आहे़ त्यामुळे पॅलेस्टाईनचे समर्थन करून भारत सरकारने इस्त्राइलवर दबाव आणावा, अशी मागणी केली़
निषेध सभा व मोर्चाचे आयोजन सर्वपक्षीय निषेध कमिटीचे संयोजक मौलाना मो़ सरवर कासमी यांनी केले होते़ यामध्ये जमीअत - ए - उलेमा हिंद, जमात - ए - इस्लामी हिंद, अहले हदीस, वहीदत ए इस्लामी, एमपीजे, पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया, मरकज मिलाद कमिटी, सीरत फाऊंडेशन, मायनॉरीटी मीडिया फोरम, खादमीने उम्मत, मीडिया फोरम, जमीअत कल्बे साज, तहजीब फाऊंडेशन, वेल्फेअर पार्टी आॅफ इंडिया, एमआयएम, एसडीपीआय आदी संघटना व पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला पाठिंबा दिला़ दरम्यान, मौलाना मो़ सरवर यांनी निवेदन दिले़ जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी निवेदन ईदगाह मैदान येथे जाऊन स्वीकारले़
निषेध सभेला सय्यद मोईन, फेरोज खान गाजी, इरशाद अहमद, फारूख अहमद, अल्ताफ हुसेन, अॅड़ मो़ अ़ रहमान, महापौर अब्दुल सत्तार, नासेर जतीक, हाफीज मो़ फारूख, मौ़ अ़ अजीम रिजवी, अब्दुल मलिक निजामी,आबेद अली, सुरेश गायकवाड उपस्थित होते़ (प्रतिनिधी)