महाशिवरात्री काळात मुर्डेश्वर महादेवाचे मंदिर बंद; यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:05 IST2021-03-09T04:05:32+5:302021-03-09T04:05:32+5:30
मुर्डेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीला राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांचीही मोठी गर्दी येथे जमा होते. ...

महाशिवरात्री काळात मुर्डेश्वर महादेवाचे मंदिर बंद; यात्रा रद्द
मुर्डेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीला राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांचीही मोठी गर्दी येथे जमा होते. मात्र, जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढत असल्याने मंदिर प्रशासक व ग्रामस्थांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत महाशिवरात्रीला खबरदारीचा उपाय म्हणून महादेवाचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच या काळात येथे भरणारी यात्राही रद्द करण्यात आली. या काळात येथे कुठलाही धार्मिक कार्यक्रम होणार नाही. कोणतीच दुकाने, रहाट पाळणे, हाॅटेल अन्य करमणुकीची साधने येणार नाही, अशी खबरदारी घेण्यात येणार आहे. यादरम्यान महादेवाच्या मंदिरात नित्य आरती, पूजा होणार असल्याचे संस्थानेच पीठाधीश ओमकारगिरी महाराजांनी सांगितले. या बैठकीला पोलीस अनिल ठाकूर, अशोक वाघमोडे, उपसरपंच बबन चव्हाण, ग्रामसेवक एम. ई. अवसरमोल, मंडळ अधिकारी ससाणे, तलाठी एम. बी. कदम, कोतवाल विठ्ठल राठोड, चेअरमन जगन कावले, यादवराव जाधव, बद्रीनाथ जाधव, डी. एम. मख आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
फोटो : केळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली आहे.