खून करणाऱ्याला जन्मठेप

By Admin | Updated: January 12, 2016 00:05 IST2016-01-11T23:54:46+5:302016-01-12T00:05:14+5:30

औरंगाबाद : आदल्या रात्रीच्या भांडणानंतर डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या अजीम शहा या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा व २००० रुपयांचा दंड ठोठावला.

Murdered murderer | खून करणाऱ्याला जन्मठेप

खून करणाऱ्याला जन्मठेप


औरंगाबाद : आदल्या रात्रीच्या भांडणानंतर डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या अजीम शहा या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा व २००० रुपयांचा दंड ठोठावला.
या प्रकरणी मुख्तार करीम कुरेशी यांनी फिर्याद दिली होती. ५ मे २०१३ रोजी रात्री काही मित्र पार्टी करण्यासाठी हारूण कुरेशी यांच्या बांधकाम साईटवर जमले होते. यावेळी पार्टी सुरू असताना मुख्तार यांचा मुलगा मुजफ्फर व अजीम शहा ऊर्फ अज्जू आमीर शहा (२८, रा. समतानगर, औरंगाबाद) यांच्यामध्ये मोबाईल चोरीवरून बाचाबाची झाली. मुजफ्फरने अजीमला मारहाण केली. मित्रांनी त्यांचे भांडण सोडविले. त्यानंतर रात्री अजीम व मुजफ्फर हे तीन मित्रांसह तेथेच झोपले तर त्यांच्यासोबतचे दोन मित्र घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे पावणेसहा वाजता अजीम क्रांतीचौक पोलीस ठाण्यामध्ये गेला व त्याने ठाणे अंमलदारास सांगितले की, ‘मी रात्रीच्या भांडणावरून मुजफ्फर कुरेशी यास डोक्यात दगड घालून जिवे मारले’. पोलिसांनी तपास केला असता तेथे मृतदेह आढळून आला. या प्रकरणी मुजफ्फर याचे वडील मुख्तार करीम कुरेशी यांनी फिर्याद दिली. त्यावरून भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी ए. पी. सोनवणे यांनी तपास केला व सोनटक्के यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. या प्रकरणी शेख नजीर, फेरोज पठाण व शेख आमीर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

Web Title: Murdered murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.