शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

बोलणे बंद केल्याने मैत्रिणीची हत्या, मृतदेह घरात पुरला; तीन बायकांनी सोडलेल्या तरुणाचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:54 IST

तीन बायकांनी सोडल्यानंतर मैत्रिणीनेही बोलणे बंद केले; संतापलेल्या तरुणाने मैत्रिणीस कायमचे संपवले 

लासूर स्टेशन ( लातूर) : येथे ६ फेब्रुवारीला खून झालेल्या मोनिका मार्कस झांबरे या परिचारिकेचा मृतदेह पोलिसांनी एका घरातून १४ फेब्रुवारीला बाहेर काढला. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या इरफान शेख या आरोपीने खुनाची कबुली दिली असून, मैत्री झाल्यानंतर बोलणे टाळत असल्याने मोनिकाचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

जालना येथील मोनिका झांबरे या परिचारिकेचा मृतदेह लासूर स्टेशन परिसरातील एका शेतातील घरातून पोलिसांनी सहा दिवसांनंतर उकरून काढला. याप्रकरणी अटक असलेल्या आरोपी इरफान शेख याने तिचा खून केल्याची कबुली दिली असून, त्याने खून करण्याचे कारण पोलिसांना सांगितले. छ. संभाजीनगर येथील सादातनगर मनपा दवाखान्यात परिचारिका म्हणून कार्यरत मोनिका हिचा विवाह येथील सुमीत निर्मळ याच्याशी झाला होता. पतीसोबत वाद झाल्याने ती माहेरी जालना येथे राहत होती. तेथून रेल्वेने संभाजीनगरला दवाखान्यात अपडाऊन करायची. रेल्वेस्टेशनवरील पार्किंगमध्ये ती स्कुटी उभी करीत असल्याने तिची तेथे काम करणाऱ्या इरफान शेखसोबत मैत्री झाली. 

इरफानचे यापूर्वी तीन लग्न झाले होते व तिन्ही पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हत्या. मोनिका व इरफान हे दोघे नंतर मोबाईलवर बोलू लागले. इरफानने यापूर्वी तिचा पतीसोबत समेट घडविण्याचाही प्रयत्न केला होता. कालांतराने मोनिका इरफानला बोलणे टाळू लागली. तिचा फोन नेहमी बिझी यायचा, यामुळे इरफान चिडला होता. त्यातच तिला संपवायचे त्याने ठरविले. त्यानंतर त्याने मोनिकाला लासूर स्टेशन येथे भेटायला तयार केले. तत्पूर्वी त्याने शेतातील घरात एक सहा फूट खोल खड्डा खाेदून घेतला होता. मोनिका ६ फेब्रुवारीला त्याच्यासोबत तेथे गेल्यानंतर इरफानने प्रथम तुला गंमत दाखवितो म्हणून तिचे हात पाय बांधले व नंतर तिचा गळा आवळून खून केला. तसेच तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून जाळून टाकले. दागिने काढून घेतले व खड्ड्यांत पुरून टाकल्याची माहिती शिल्लेगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली.

मोबाईलवरून नातेवाइकांना केले मेसेजमोनिकाला ठार मारल्यानंतर इरफानने तिच्या मोबाईलवरून तिच्या नातेवाइकांना मेसेज करून मला शोधू नका, मी दुसरे लग्न केले असल्याचे सांगितले. मात्र कुटुंबीय तिला कॉल करायचे तेव्हा फोन उचलला जात नव्हता. इरफानने तिचे दागिने लासूर स्टेशन येथील एका सोनाराला विकले व बॅग छ. संभाजीनगरमधील एका नाल्यात फेकून दिली. फोन उचलला जात नसल्याने नातेवाइकांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपी इरफानच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू