शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात नशेखोरीतून हत्याकांड, तरुणाला मित्रानेच चाकू खुपसून संपवलं

By सुमित डोळे | Updated: May 24, 2025 19:59 IST

पोलिस श्वान पथकाने घटनास्थळापासून माग काढला अन् काही अंतरावर मारेकऱ्याची दुचाकी सापडली.

छत्रपती संभाजीनगर : जिन्सी भागातील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, अवघ्या महिन्याभरात उस्मानपुऱ्यातील कबीरनगर परिसरात पुन्हा एक धक्कादायक हत्या घडली आहे. नशेखोरीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेमुळे शहर पुन्हा हादरले आहे. आज, शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रेल्वेरुळाशेजारील एका पडक्या इमारतीच्या मैदानात राजन प्रल्हाद काकडे (२२) या तरुणाची त्याच्याच मित्राने छातीत चाकू खुपसून हत्या केली. 

राजन आपल्या कुटुंबासह कबीरनगरमध्ये वास्तव्यास होता. तो दुपारी १ वाजता घराबाहेर पडला होता. सुमारे २ वाजेच्या सुमारास परिसरातील काही मुले क्रिकेट खेळण्यासाठी त्या मैदानात गेली असता, त्यांनी राजनला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले पाहिले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. रणजित पाटील, सातारा पोलीस निरीक्षक संग्राम ताठे, उस्मानपुरा निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक अमोल कामठे, दिलीप बचाटे, नंदकिशोर भंडारे आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासातच राजनचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला.

श्वानाने काढला मागपोलिस तपासात ही हत्या नशेखोरीच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजनची हत्या परिचयातीलच एका तरुणाने केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. पोलिस श्वान पथकाने घटनास्थळापासून राजनच्या चपलांपर्यंतचा माग घेतला आणि त्यानंतर काही अंतरावर मारेकऱ्याची दुचाकी सापडली. पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली आहे. सतनाम नावाच्या तरुणावर संशय असून, त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDrugsअमली पदार्थ