मुलाचा खून; आई-वडिलांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:51 IST2017-09-09T00:51:50+5:302017-09-09T00:51:50+5:30

जन्मदात्या आई-वडिलानेच मुलाच्या मदतीने स्वत:च्या दुसºया १८ वर्षीय मुलाचा खून केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी मयताचे आई-वडील व भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

Murder of a child; FIR against Parents | मुलाचा खून; आई-वडिलांवर गुन्हा दाखल

मुलाचा खून; आई-वडिलांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
शिऊर : जन्मदात्या आई-वडिलानेच मुलाच्या मदतीने स्वत:च्या दुसºया १८ वर्षीय मुलाचा खून केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी मयताचे आई-वडील व भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
बुधवारी पहाटे वैजापूर तालुक्यातील पोखरी येथे उद्धव सुभाष ठुबे (१८) याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याबाबत नातेवाईकांनी पोलिसात कुठलीही माहिती न देता परस्पर अंत्यविधी उरकून टाकला
होता. परंतु शिऊर पोलिसांना या घटनेविषयी माहिती मिळाली की, उद्धव याचा खून झाला असून त्यास त्याचे आई-वडील व भाऊ जबाबदार आहे. त्यावरून शिऊर पोलिसांनी या घटनेची चौकशी करून पो.हे.कॉ. रामचंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून सुभाष नानासाहेब ठुबे (वडील), ताराबाई सुभाष ठुबे (आई), प्रदीप सुभाष ठुबे (भाऊ) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करुन सर्वांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करीत आहेत.

Web Title: Murder of a child; FIR against Parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.