खूनप्रकरणी पती, सासूला जन्मठेप
By Admin | Updated: January 2, 2015 00:46 IST2015-01-02T00:28:18+5:302015-01-02T00:46:46+5:30
बीड : विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी तिचा पती अशोक तुकाराम काळे व सासू हिराबाई काळे यांना दोषी ठरवत त्यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अशोक भटकर यांनी जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी सुनावली.

खूनप्रकरणी पती, सासूला जन्मठेप
बीड : विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी तिचा पती अशोक तुकाराम काळे व सासू हिराबाई काळे यांना दोषी ठरवत त्यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अशोक भटकर यांनी जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी सुनावली.
राजश्री हिचा चांदेगाव येथील अशोक काळे याच्या सोबत मे २०१३ मध्ये झाला होता. २ आॅक्टोबर रोजी सकाळी राजश्री हिचा तिच्या सासू सोबत नवीन चप्पल आणण्याच्या कारणांवरुन भांडण झाले होते. त्यामुळे सासू हिराबाई हिने तिला घराबाहेर काढले होते. त्यामुळे राजश्री ही तिची आत्या परिगाबाई यांच्याकडे चौसाळा येथे गेली़ ३ आॅक्टोबर २०१३ रोजी, पती अशोक काळे याने ‘तु कोठे पळून गेली होतीस’ या कारणावरुन राजश्री हिच्या सोबत भांडण करुन मारहाण केली होती. ४ आॅक्टोबर रोजी रात्री १२ वाजता पुन्हा ‘तु कोठे पळून गेली होतीस’ याच कारणावरुन अशोक व त्याच्या आई हिराबाई व सासरा तुकाराम यांनी तिच्या सोबत भांडण केले. त्यानंतर नवरा अशोक याने तिच्या अंगावर रॉकेल टाकले तर सासू हिराबाईने काडी ओढून पेटविले़ त्यानंतर तिला उपचारासाठी नेले. राजश्रीचा १० आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. मृत्युपूर्वी पोलिसांनी तिचा जवाब घेतला होता. सदर गुन्ह्याचा तपास नेकनूर ठाण्याचे फौजदार माळोदे यांनी केला.
मृत्युपूर्व जवाब व सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्यधरत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक भटकर यांनी आरोपी अशोक काळे व हिराबाई काळे यांना जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावला. तुकाराम काळे यांची निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील मिलींद वाघीरकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)