खून करून प्रेत जाळले
By Admin | Updated: May 23, 2015 00:38 IST2015-05-23T00:22:10+5:302015-05-23T00:38:04+5:30
जामखेड: अंबड तालुक्यातील जामखेड शिवारात अनोळखी इसमाचा खून करून प्रेत पऱ्हाटीच्या फासावर जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी भल्यापहाटे ४ वाजेच्या पूर्वी घडली.

जामखेड - किनगाव रस्त्यावर शुक्रवारी भल्यापहाटे एका अनोळखी इसमास खून करून अज्ञात लोकांनी त्याचे प्रेत रस्त्याच्या कडेला असलेल्या पऱ्हाटीच्या गंजीवर टाकून जाळून टाकले. मात्र हा मृतदेह अर्धवट जळाल्याने सकाळी ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व अर्धवट जळालेल्या सांगडा उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)