मुरारीनगरात घरफोडी

By Admin | Updated: May 12, 2015 00:48 IST2015-05-12T00:10:07+5:302015-05-12T00:48:52+5:30

जालना : शहरातील कॉलेजरोडवरील मुरारीनगरात व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंपास केला. मात्र पोलिसात ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याची नोंद करण्यात आली आहे.

Murarinagar burglary | मुरारीनगरात घरफोडी

मुरारीनगरात घरफोडी


जालना : शहरातील कॉलेजरोडवरील मुरारीनगरात व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंपास केला. मात्र पोलिसात ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याची नोंद करण्यात आली आहे.
कापड व्यापारी विशाल बन्सीलाल टेकवानी हे आपल्या मुरारी नगराजवळील घरात झोपलेले असताना रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे चेनल गेट तोडून पाठीमागील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील दोन कपाट तोडून त्यातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा मोठा ऐवज लंपास केला. टेकवानी यांनी ९ तोळे सोने व दीड लाख रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
दरम्यान सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मात्र ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याचे नमुद करण्यात आले. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सदर बाजार पोलिस ठाण्याचे सपोनि शितलकुमार बल्लाळ , उपनिरिक्षक डावखरे यांनी भेट देवून पंचनामा केला. तसेच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. घरफोडीत चोरट्यांनी शंभर, पाचशे, हजार रूपयांच्या नोटांचे बंडल चोरून नेले. मात्र एक रूपया, दोन रूपयाची बंडले तशीच सोडली.
सदर बाजार पोलिस ठाण्याचा दुरध्वनी रिसिव्हर बाजूला ठेवण्यात आला होता.या संदर्भात सदर प्रतिनिधीने ठाणे अमलंदार दिवटे यांना विचारले असता ते म्हणाले की, ११ हजाराचे बिल थकल्याने दुरध्वनी विभागाने सेवा खंडीत केली असल्याचे सांगितले. दरम्यान रात्री ९ वाजेच्या सुमारास ठाण्याचा दुरध्वनी लावला असता तो चालु होता. त्यावेळी ठाणे अमंलदार मतकर यांनी हा फोन उचलला होता. दरम्यान ठाण्याच्या हद्दीत अशा चोऱ्या, घरफोड्या, जातीय दंगली सारखे गंभीर गुन्हे घडत असताना ठाने अमंलदारांकडून फोन बाजूला ठेवण्याचे प्रकार सर्वच पोलिस ठाण्यात होत आहे.
४नवीन जालना भागात मोठी व्यापारपेठ आहे. मात्र ठाण्याचा दुरध्वनीच बंद असल्याने रात्री अपरात्री अशा चोऱ्यांच्या घटना घडत आहे. त्यामुळे पोलिसांना संपर्क साधावा कसा असा प्रश्न पडत आहे. केवळ ११ हजार रूपयाचे बिल थकल्याने सेवा खंडित करण्यात आल्याचे ठाणे अमलंदार दिवटे यांनी सांगितले.

Web Title: Murarinagar burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.