शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

‘मुन्नाभार्इं’चा रुग्णांच्या आरोग्याशी खेळ !

By admin | Updated: January 19, 2015 00:58 IST

संजय तिपाले , बीड ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याने पात्रता नसतानाही डॉक्टर होण्याची भन्नाट भूमिका साकारली आहे.

संजय तिपाले , बीड‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याने पात्रता नसतानाही डॉक्टर होण्याची भन्नाट भूमिका साकारली आहे. बीड जिल्ह्यात तर प्रत्यक्षात असे मुन्नाभाई ठिकठिकाणी अवतरले आहेत. खेडोपाड्यात त्यांनी दवाखान्यांच्या नावाखाली दुकानदाऱ्या सुरु करुन रुग्णांच्या जिवाशी अक्षरश: खेळ मांडला आहे. बोगस डॉक्टरांना पकडण्यासाठी नेमलल्या पथकांची ‘मात्रा’ काही लागू पडलीच नाही.जिल्ह्यात २००० ते २०१४ या काळात ४६ बोगस डॉक्टरांविरुद्ध फिर्याद नोंद झाली. त्यावरुन बोगस डॉक्टर किती फोफावले आहेत? हे स्पष्ट होते. राज्यात आरोग्यसेवेसाठी चार कौन्सिलची निर्मिती केलेली आहे. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, डेन्टिस्ट या कौन्सिलचा समावेश आहे. नोंदणी केलेल्या डॉक्टरांनाच खासगी दवाखाने सुरु करुन वैद्यकीय सेवा देता येतात. मात्र, काही जणांनी वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकृत परवाना नसतानाही दवाखाने थाटली आहेत. अशा बोगस डॉक्टरांकडून अघोरी उपचार होण्याची शक्यताही नाकरता येत नाही. त्यामुळे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाया करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बोगस डॉक्टरविरोधी पथके स्थापन केली. जिल्हास्तरावर तसेच तालुकापातळीवर स्थापन केलेल्या या पथकांनी केवळ २०१२ मध्ये कारवायांचा सपाटा लावला होता. त्याआधी व नंतरच्या दोन वर्षात पथकाने कारवाया कमी अन् केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम केल्याचे निष्पन्न झाले आहे. पथके थंडगार असल्याने बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर जीवघेणी ‘प्रॅक्टिस’ सुरु आहे. वर्षनिहाय पकडलेले बोगस डॉक्टर२००० (३), २००१ (१), २००२ (४), २००३ (४), २००४ (३), २००५ (०) २००६ (५), २००७ (१), २००८ (१), २००९ (१), २०१० (२), २०११ (४), २०१२ (१४), २०१३ (३), २०१४ (०), २०१५ (०) (कंसातील आकडे बोगस डॉक्टरांचे)शोधमोहीम राबवूजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे म्हणाले, बोगस डॉक्टरांविरुद्ध तक्रार आल्यावर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी कारवाया करतात. पकडलेल्या बोगस डॉक्टरने पुन्हा व्यवसाय करु नये, यासाठी आता कारवाई करतानाच ठोस पुरावे गोळा करण्यात येतील. शिवाय शोध मोहीम राबवून बंदोबस्त करण्यात येईल.