पालिका स्वीकारणार ५०० आणि १००० च्या नोटा
By Admin | Updated: November 11, 2016 00:23 IST2016-11-11T00:24:43+5:302016-11-11T00:23:07+5:30
जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर त्या नोटा विविध बँकेत जमा करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

पालिका स्वीकारणार ५०० आणि १००० च्या नोटा
जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर त्या नोटा विविध बँकेत जमा करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. आता त्या नोटा पालिकाही स्वीकारणार आहे. म्हणजे विविध करांच्या रूपात, त्यासाठी विशेष शिबीर लावण्यात येणार असून, शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत कर स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली.
याबाबत राज्य शासनाने गुरूवारी परिपत्रक काढून सर्व नगर परिषद, नगर पंचायत यांना नागरिकांच्या कराची थकबाकी स्वीकारताना या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा घेण्याचे आदेश दिले. तसेच त्यासाठी रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जालना नगर पालिकेले विशेष कर वसुली मोहीम हाती घेतली. गुरूवारी सांयकाळी ६ वाजेपासून ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत ही वसुली मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी नगर परिषद कार्यालयात कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी १० टेबलवर ३० वसूली लिपिक व ४ कर निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कॅम्प मध्ये ५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. तेव्हा नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन खांडेकर यांच्यासह कर अधीक्षक एच.ए. आंधळे यांनी केले आहे.