संकटांच्या उंबरठ्यावर महापालिका

By Admin | Updated: November 7, 2014 00:51 IST2014-11-07T00:32:41+5:302014-11-07T00:51:39+5:30

औरंगाबाद : महापालिका हळूहळू आर्थिक व इतर दैनंदिन संकटांच्या पिंजऱ्यात अडकू लागली आहे.

The municipality on the threshold of the crisis | संकटांच्या उंबरठ्यावर महापालिका

संकटांच्या उंबरठ्यावर महापालिका

औरंगाबाद : महापालिका हळूहळू आर्थिक व इतर दैनंदिन संकटांच्या पिंजऱ्यात अडकू लागली आहे. महानगरपालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या दालनात वेगवेगळ्या समस्यांचा शोध घेण्यासाठी बैठका झाल्या. सर्व पदाधिकाऱ्यांची दालने दुपारनंतर भरगच्च होती.
महापौर कला ओझा यांच्या दालनात सफाई कर्मचाऱ्यांच्या सुट्यांच्या मोबदल्यांसाठी बैठक झाली. एलबीटीचे उत्पन्न घटल्यामुळे महापौर अधिकाऱ्यांवर संतापल्या होत्या. विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांच्या दालनात कंत्राटदारांची थकबाकी प्रकरणात बैठक झाली.
सभापती विजय वाघचौरे यांनी शहरातील रस्त्यांची कामे रखडल्यामुळे बैठक घेतली.
फिश मार्केटचे काम रखडल्यामुळे उपमहापौर संजय जोशी यांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली, तर राज्य शासनाने नोटीस दिल्यामुळे डेंग्यू निर्मूलनासाठी घनकचरा विभाग आणि आरोग्य विभागाची स्थायी समिती सभागृहात बैठक झाली.

Web Title: The municipality on the threshold of the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.