पालिका कर्मचारी १५ पासून संपावर
By Admin | Updated: July 14, 2014 01:03 IST2014-07-14T00:16:23+5:302014-07-14T01:03:20+5:30
हिंगोली : महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने १५ जुलैैपासून राज्यभर विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला

पालिका कर्मचारी १५ पासून संपावर
हिंगोली : महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने १५ जुलैैपासून राज्यभर विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला असल्याची माहिती राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी दिली.
राज्यातील पालिका कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाकडून १०० टक्के पगार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावा ही प्रमुख मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.
तसेच नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४ वर्षांची कालबद्ध पदोन्नती लागू करण्यात यावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नगर पालिका कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतनश्रेणी लागू करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकित देणी तत्काळ देण्यात यावीत आदी मागण्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने शासनाकडे करण्यात आली होती.
दरम्यान, या संघटनेच्या या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने राज्यातील ७० हजार नगर पालिका कर्मचारी तसेच परभणी, लातूर व चंद्रपूर महानगर पालिकेचे कर्मचारी १५ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)