सभेच्या वेळीच जीटीएलने कापली मनपाची वीज
By Admin | Updated: July 11, 2014 01:04 IST2014-07-11T00:45:23+5:302014-07-11T01:04:08+5:30
औरंगाबाद : जीटीएल कंपनीने आज सर्वसाधारण सभा सुरू असतानाच थकित बिलासाठी वीजपुरवठा खंडित करून महापालिकेचा घाम काढला.

सभेच्या वेळीच जीटीएलने कापली मनपाची वीज
औरंगाबाद : जीटीएल कंपनीने आज सर्वसाधारण सभा सुरू असतानाच थकित बिलासाठी वीजपुरवठा खंडित करून महापालिकेचा घाम काढला.
बुधवारी ८ जुलै रोजी मनपाने ९ कोटी रुपयांचे धनादेश गुत्तेदारांना अदा केले. मात्र, जीटीएलचे बिल भरणा करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. प्राधान्याच्या खर्चात वीज बिल अदा करणे महत्त्वाचे आहे. मात्र, बिल न भरल्यामुळे आज सभा सुरू असतानाच जीटीएलने वीज
कापली.
जीटीएल कंपनीने कळविले आहे की, मनपाकडे साडेसहा कोटींचे बीज बिल थकले आहे.
मनपाकडे बिलासाठी वारंवार विनंती केली. नोटीसही दिली; परंतु थकबाकी न मिळाल्यामुळे दुपारी ३ वा. प्रशासकीय इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने ५० लाख रुपयांचे बिल अदा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पथदिवे आणि प्रशासकीय इमारतीतील वीज वापराचे बिल मागील महिन्यांपासून थकले आहे. उपमहापौर संजय जोशी यांनी या प्रकरणी आढावा घेतला.