पालिका सभेत नगरसेविकेऐवजी पतीच्या उपस्थितीने राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 16:42 IST2017-08-08T16:41:43+5:302017-08-08T16:42:27+5:30
नगर पालिका सभागृहात आज विषेश सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यात उपनगराध्यक्षांसह एकही महिला नगरसेविका उपस्थित नव्हत्या. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी बैठकीच्या ठिकाणी येवून नगरसेविकांच्या जागी आलेल्यांना बाहेर काढा म्हणुन चांगलाच राडा केला.

पालिका सभेत नगरसेविकेऐवजी पतीच्या उपस्थितीने राडा
ऑनलाईन लोकमत / पुरुषोत्तम करवा
माजलगांव (बीड ), दि. ८ : नगर पालिका सभागृहात आज विषेश सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यात उपनगराध्यक्षांसह एकही महिला नगरसेविका उपस्थित नव्हत्या. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी बैठकीच्या ठिकाणी येवून नगरसेविकांच्या जागी आलेल्यांना बाहेर काढा म्हणुन चांगलाच राडा केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरणातील तणाव निवळला.
पालिका सभेसाठी नेहमीच महिला नगरसेविका उपस्थित न राहता त्यांचे पती किंवा मुले सभेमध्ये बसुन थेट निर्णय प्रक्रियेत सामिल होतांना दिसतात. हे घटनेने दिलेल्या महिला आरक्षणाच्या विसंगत आहे. हा चुकीच्या पायंडयाला माजलगांव नगर पालिकेत खतपाणी घातले जात आहे. महिला सदस्यांना मिळालेल्या अधिकारांची ही गळचेपी असुन राज्यघटनेच्या कोणत्या अधिकाराखाली नगरसेविकांच्या पती अथवा मुलांना थेट सभेत बसण्याची परवानगी आहे याचा उलगडा पालिकेने करावा अशी मागणी सत्यभामा सौंदरमल यांनी यावेळी केली.
नगरसेविकांच्या सह्या होतात घरी
सभा संपल्यानंतर सभेस अनुपस्थित असलेल्या महिला नगरसेविकांच्या सहया त्यांच्या घरी घेतल्या जातात. यासाठी एक कारकुन त्यांच्या घरी जात असल्याचे एका कर्मचा-याने सांगीतले.
नगराध्याक्षाना आहेत अधिकार
पालिकेत होणा-या प्रत्येक बैठकीचे अध्यक्ष व पिठासीन अधिकारी हे दोन्ही पदे नगराध्यक्ष यांच्याकडे असतात. यामुळे बैठकीत कोणाला बसु द्यावे , कोणाला नाही याबाबतचे सर्व अधिकार त्यांना आहेत.
- बी. सी. गावित, मुख्याधिकारी
दक्षता घेऊ
पुढील बैठकीत महिला सदस्यांनी स्वतः उपस्थित राहावे असे त्यांना कळविण्यात येईल. याबाबत दक्षता घेण्यात येईल.
- सहाल चाउस, अध्यक्ष, नगर परिषद