मनपाला तो कर भरावाच लागेल
By Admin | Updated: March 15, 2016 00:45 IST2016-03-15T00:45:04+5:302016-03-15T00:45:04+5:30
औरंंंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाकडे महसूल प्रशासनाचा थकलेला १ कोटी ३१ लाखांचा मनोरंजन कर महानगरपालिकेला भरावाच लागेल.

मनपाला तो कर भरावाच लागेल
औरंंंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाकडे महसूल प्रशासनाचा थकलेला १ कोटी ३१ लाखांचा मनोरंजन कर महानगरपालिकेला भरावाच लागेल. विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी सोमवारी घेतलेल्या सुनावणीत मनपाची कर माफ करण्याची विनंती फेटाळली.
मनपाच्या सिद्धार्थ उद्यानाकडे महसूल प्रशासनाचा अकृषक १ कोटी ३१ लाख रुपये एवढा कर थकीत आहे.
वारंवार विनंती करूनही मनपाने कर भरण्यास टाळाटाळ केली आहे. महसूल प्रशासनाने नोटीस बजावून उद्यान सील करण्याची तंबी दिली. त्यानंतर मनपाने १० लाख रुपये भरले. तसेच मनपाने उर्वरित कराची रक्कम माफ करावी, अशी विनंती विभागीय आयुक्तांना केली होती. विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांनी सोमवारी यावर सुनावणी घेतली. मनपाला थकीत कर भरण्याचे आदेश दिले.